ऊन घ्यायचे आहे तर ९०० रूपये द्या, रेस्टॉरंटची अजब सर्व्हिस

मुंबई: जगात असे विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंट असतात ज्यांची एक वेगळी खासियत असते. त्यांची सर्व्हिस करण्याची पद्धत तसेच तेथील वातावरण यावरून ते हॉटेल प्रसिद्ध होते. असेच एका स्पॅनिश रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना अजबच सर्व्हि पाहायला मिळाली. तेथे त्यांना बिलासोबत एक वेगळाच चार्ज आकारण्यात येत असल्याचे दिसले.


आज जगात सगळ्याच गोष्टी पैशाने मिळत आहेत. सूर्याचा प्रकाश आणि हवा तितकीच काही फुकट मिळत आहे. काही ठिकाणी तर हवाही पैशाने विकत घ्यावी लागत आहे. मात्र हे एक असे रेस्टॉरंट आहे जे फुकट मिळत असलेल्या गोष्टीसाठी पैसे आकारत आहे. तुम्हाला ऐकायला हे काही विचित्रच वाटेल मात्र स्पेनमधील एक शहर Seville येथे पर्यटकांना उन्हात बसण्यासाठीचे पैसेही वसूल केले जात आहेत.



ऊन घ्यायचे असेल तर पैसे द्या


एका रिपोर्टनुसार दक्षिण स्पेनमदील सेविले शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना या विचित्र सर्व्हिसचे आश्चर्य वाटत आहे. येथील रेस्टॉरंटमधील पर्यटकांना विचारले जाते की त्यांना ऊन्हात बसून जेवण करायचे आहे का? स्पेनमध्ये थडी असते अशातच प्रत्येकाला वाटेल की उन्हात बसून जेवण करावे. मात्र त्यांना त्या बदल्यात ८.५० युरो म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये ८७९ रूपये द्यावे लागतात. दरम्यान, पर्यटक अशा रेस्टॉरंटसाठी वाईट रिव्ह्यू लिहित आहेत. तसेच तेथील स्थानिक लोकांना मात्र वाईट वाटत आहे की ऊन देण्याच्या निमित्ताने हे हॉटेलवाले अधिक पैसे उकळत आहे.

Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या