Thursday, July 25, 2024
Homeक्राईमElvish Yadav : केवळ आपल्या नावाची प्रसिद्धी आणि चर्चा व्हावी या उद्देशानं...

Elvish Yadav : केवळ आपल्या नावाची प्रसिद्धी आणि चर्चा व्हावी या उद्देशानं केलं ‘हे’ कृत्य

रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादवचा धक्कादायक खुलासा

नोएडा : गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) नोएडा येथे झालेली रेव्ह पार्टी (Rave Party) चर्चेत आली आहे. या पार्टीमध्ये प्रसिद्ध युट्युबर (Youtuber) आणि बिग बॉस (Bigg Boss) विजेता स्पर्धक एल्विश यादवचे (Elvish Yadav) नाव जोडण्यात आले. त्याने या पार्टीसाठी साप आणि सापाचे विष (Snake Venom) पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला. सुरुवातीला एका व्हिडीओच्या माध्यमातून आपण असं काहीच केलं नसल्याचा दावा त्याने केला होता. मात्र, पोलिसांनी कसून तपास केला असता एल्विशने अखेर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला अटक करण्यात आली. यानंतर त्याने हे कृत्य का केलं याचाही पोलीस चौकशीत खुलासा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा पोलिसांनी त्या पार्टी प्रकरणावरुन एल्विशवर एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा (NDPS Act) दाखल केला होता. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याच्यावर नोएडा (Noida Gurugoan Rave Party) आणि गुरुग्राम येथील रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. यात पोलिसांनी सापाचे विष वापरण्याचे कारण काय याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी असे म्हटले आहे की, त्याने केवळ आपल्या नावाची प्रसिद्धी आणि चर्चा व्हावी या उद्देशाने हे कृत्य केलं होतं.

एल्विशला सापाच्या विषाची तस्करी प्रकरणात पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. त्यानंतर रविवारी नोएडा येथील न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांसाठी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सध्या एल्विशच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो (Elvish Yadav Mother Viral Video) आहे. त्यात त्याची आई रडताना दिसत आहे. एल्विशच्या बाबत जे काही घडले आहे त्यावरुन त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्याचे फॉलोअर्सही चिंतेत आहेत. भरपूर पैसे कमविण्याबरोबरच एल्विशने चाहत्यांना आपण कुणालाही घाबरत नाही हेही दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -