Tuesday, April 29, 2025

देशताज्या घडामोडी

खराब हवा : बांगलादेश आघाडीवर; पाक दुसऱ्या, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर

खराब हवा : बांगलादेश आघाडीवर; पाक दुसऱ्या, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली : २०२३ मध्ये भारत तिसरा सर्वात खराब हवेचा दर्जा असलेला देश राहिला. स्विस संस्थेच्या आयक्यू एअरच्या जागतिक वायू गुणवत्ता अहवाल २०२३ नुसार बांगलादेश हा जगातील सर्वात खराब हवा असलेला देश होता. तर १३४ देशांच्या यादीत पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे.

या अहवालानुसार, नवी दिल्ली सर्वात खराब हवा असलेली राजधानी होती. त्याच वेळी, बिहारचे बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित महानगर बनले, २०२२ मध्ये बेगुसरायचे नावही या यादीत नव्हते. २०२२ मध्ये प्रदूषित हवा असलेल्या देशांच्या यादीत भारत आठव्या क्रमांकावर होता.

या अहवालात पीएम - २.५ कणांच्या आधारे देश, राजधानी आणि शहरांची क्रमवारी लावली आहे. हा एक प्रकारचा कण आहे, ज्याचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी आहे. हे अतिशय लहान कण आहेत, जे हवेची गुणवत्ता खराब करतात. गेल्या वर्षी भारतात पीएम २.५ ची सरासरी पातळी १ घनमीटरमध्ये ५४.४ मायक्रोग्रॅम होती. हे डब्ल्यूएचओ स्केलपेक्षा १० पट जास्त होते.

गेल्या वर्षी राजधानी दिल्लीत पीएम २.५ ची पातळी १ घनमीटरमध्ये ९२.७ मायक्रोग्रॅम होती, तर बेगुसरायमध्ये ते ११८.९ मायक्रोग्रॅम होते. २०१८ पासून सलग चार वेळा दिल्लीला जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून स्थान देण्यात आले आहे. अहवालानुसार, भारतातील १.३३ अब्ज म्हणजेच ९६% लोक अशा हवेत राहतात ज्यामध्ये पीएम २.५ ची पातळी डब्लूएचओच्या वार्षिक मानकापेक्षा ७ पट जास्त आहे. देशातील ६६% शहरांमध्ये वार्षिक पीएम २.५ पातळी ३५ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपेक्षा जास्त होती. डब्लूएचओच्या म्हणण्यानुसार, जगात दरवर्षी ७० लाख लोक प्रदूषित हवेमुळे मरतात आणि मरणाऱ्या प्रत्येक ९ लोकांपैकी १ जण खराब हवेमुळे मरत आहे.

पीएम २.५ म्हणजे काय?

पीएम म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर जे हवेत लहान कण असतात. हे वातावरणात असलेले घन कण आणि द्रव थेंब यांचे मिश्रण आहे, जे उघड्या डोळ्यांना दिसत नाही. काही कण इतके लहान असतात की, ते फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरून शोधले जाऊ शकतात. पीएम २.५च्या संपर्कात आल्याने अनेक आजार होऊ शकतात. यामध्ये दमा, कर्करोग, पक्षाघात आणि फुफ्फुसाच्या आजारांचा समावेश आहे. त्याच वेळी, या सूक्ष्मकणांच्या उच्च पातळीच्या संपर्कात आल्याने मुलांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो. त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या असू शकतात आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो.

जगातील सर्वात प्रदूषित हवा दिल्लीत!

अनेक दिवसांपासून सातत्याने संपूर्ण जगातील सर्वात प्रदूषित राजधानी दिल्लीचे नाव चौथ्यांदा पुढे आले आहे. तर शहरांच्या यादीत बिहार बेगूसराय समोर आले आहे. जगभरातील प्रदूषणवर लेटेस्ट रिपोर्ट समोर आले आहेत. यामध्ये दिल्ली सर्वात खराब वायू गुणवत्ता असणाऱ्या राजधानीच्या रूपात समोर आली आहे. स्विस कंपनी आयक्यू एयर द्वारे विश्व वायु गुणवत्ता रिपोर्ट २०२३ जारी करण्यात आले आहे. २०२२ च्या तुलनेत भारतात प्रदूषण वाढले आहे. यादीमध्ये भारत आठव्या स्थानावरून प्रदूषण यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

Comments
Add Comment