मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४ची(ipl 2024) सुरूवात २२ मार्चपासून होत आहे. मात्र त्याआधीच हार्दिक पांड्याच्या नेचृत्वातील मुंबई इंडियन्सला जोरदार झटका बसला आहे. हा झटका सूर्यकुमार यादवने दिला आहे. दुखापतींनी ग्रस्त असलेला सूर्यकुमार यादव आयपीएलच्या काही सामन्यांतून बाहेर होणे निश्चित आहे. मात्र त्याच्यासमोर संपूर्ण आयपीएलच्या हंगामातून बाहेर होण्याची भीती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादवची आज फिटनेस टेस्ट होती. अशातच बातमी येत आहे की त्याला नॅशनल क्रिकेट अकादमीकडून मंजुरी मिळालेली नाही.अशातच सूर्या आयपीएल २०२४च्या हंगामातून बाहेर होऊ शकतो.
सूर्याने शेअर केली इमोजी
रिपोर्ट्सनुसार सूर्यकुमार यादवची पुढील फिटनेस टेस्ट काही दिवसांनी होणार आहे. त्यानंतर ठरणार की सूर्या पुढील सामने खेळणार की नाही. यातच सूर्यकुमारनेही एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत यावर शिक्कामोर्तब केले.
सूर्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक हार्टब्रेकचा इमोजी शेअर केला. फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्याने तो निराश झालाय. आयपीएलमधील काही सामन्यात तो बाहेर राहू शकतो. जर तो पुढील टेस्ट पास झाला नाही तर तो संपूर्ण हंगामातून बाहेर जाऊ शकतो.