Monday, June 30, 2025

माता लक्ष्मीला नाराज करतात घरातील या चुका

माता लक्ष्मीला नाराज करतात घरातील या चुका

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात धन देवता माता लक्ष्मीचा वास असतो तेथे कधीच आर्थिक तंगी येत नाही. माता लक्ष्मीची कृपा ज्यांच्यावर राहते त्यामुळे लोक सुखी होतात. त्यांना कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.


ज्यांच्यावर लक्ष्मी मातेचा आशिर्वाद असतो ते कुटुंब नेहमी आनंदी राहते. घरात सकारात्मक वातावरण राहते. दरम्यान, अनेकदा घरात होणाऱ्या काही चुका धन देवता लक्ष्मी मातेला नाराज करतात.


वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी मातेला साफ-सफाई खूप आवडते. ज्या ठिकाणी स्वच्छता नसते तेथे लक्ष्मीचा वास नसतो.


लक्ष्मी मातेला कधीही नाराज करू नये. त्यामुळे घरात नेहमी साफ सफाई ठेवली पाहिजे.


शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा असतो. या दिवशी संपूर्ण घर चांगल्या पद्धतीने स्वच्छ ठेवले पाहिजे. शुक्रवारी लक्ष्मी मातेचे पूजन करणे गरजेचे असते. असे केल्याने धनदेवता प्रसन्न होते.

Comments
Add Comment