Friday, June 20, 2025

असोसिएशनने बंद केलेली ज्येष्ठ सभासद सुविधा शुल्क सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी

असोसिएशनने बंद केलेली ज्येष्ठ सभासद सुविधा शुल्क सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी

नवी मुंबई - नवी मुंबई स्पोर्टस् असोशियशनने ज्येष्ठ सभासदांना देण्यात येणारी स्टीम, सोना व झाकुझी सुविधा शुल्कातील सवलत अचानक बंद केल्याने, ज्येष्ठ सभासदांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.यामुळे क्लबचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता, सवलतीच्या दरात पुन्हा सदर सेवा सुरू कराव्यात अशी मागणी ज्येष्ठ सभासदांनी केली आहे.


नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने क्लबच्या जेष्ठ सभासदांना स्टीम, सोना व झाकुजी सुविधा सवलत दरात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा फायदा हा क्लबचे संस्थापक सदस्य असलेले जेष्ठ सभासद घेत आहेत. हे सदस्य क्लबच्या स्थापने पासुन त्याच्या मागे आधारस्तंभ म्हणून उभे आहेत.


नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या कमिटीने अचानक जेष्ठ सभासदांना सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या स्टीम, सोना व जकुझी शुल्कातील सवलत बंद केल्या आहेत. यामुळे ज्येष्ठ सभासदांमध्येअसंतोष निर्माण झाला आहे.


नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशने स्टीम, सोना व झाकुजी शुल्कातील सवलत बंद केल्याने या सुविधांचा दैनंदिनी लाभ घेणाऱ्या सदस्य संख्या कमी झाली आहे. यामुळे क्लबच्या उत्पन्नात घट होऊन, त्यांचे आर्थिक नुकसान देखिल होत आहे.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी स्ट्रीम, सौना व जकुझी शुल्कातील सवलत बंद केलेली सवलत पुन्हा सुरू करावी असा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेच्या निर्णयाला ६ महिने उलटले तरी अद्याप स्टीम, सोना व झाकुजी शुल्कातील सवलत सुरू करण्यात आलेली नाही. क्लबचे ज्येष्ठ सभासदांसाठी. स्टीम सोना व झाकुजी, शुल्कातील सवलत सेवा पूर्ववत करावी अशी मागणी ज्येष्ठ सभासदांनी नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनचे उपाध्यक्ष व सचिव याच्याकडे लेखी पत्र पाठवून केली आहे.

Comments
Add Comment