
मुंबई: बांगलादेशने श्रीलंकेला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ ने हरवले. बांगलादेशने मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ४ विकेटनी विजय मिळवला. हा सामना चटगाव येथे सोमवारी खेळवण्यात आला. बांगलादेशने मालिकेत विजय मिळवला असला तरी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संघाचे चार खेळाडू एकाच सामन्यात दुखापतग्रस्त झाले आहेत.
वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान, अनामुल हक, झाकिर अली आणि सौम्य सरकार दुखापतग्रस्त झाला आहे. दोन खेळाडूंची दुखापत इतकी गंभीर होती की त्यांना स्ट्रेचरवरून बाहेर न्यावे लागले.
#MustafizurRahman struggled with cramps during the third ODI against Sri Lanka and had to be stretchered off 😢 pic.twitter.com/9Wyt7xSt62
— Chityala srikanth (@srichanti73) March 18, 2024
खरंतर, श्रीलंका वनडे मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरली. या दरम्यान मुस्तफिझुर रहमान आणि झाकिर अली दुखापतग्रस्त झाले. या दोन्ही खेळाडूंना स्ट्रेचरवरून बाहेर न्यावे लागले. मुस्तफिझुर रहमान श्रीलंकेच्या खेळीदरम्यान ४८वे षटक खेळत होता. या ओव्हरमधील पहिला बॉल टाकताना त्याला त्रास होऊ लागला. त्याची हालत इतकी खराब झाली की त्याला उठताही येत नव्हते. यानंतर स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले.
बांगलादेश-श्रीलंका सामन्यांतील मोठी घटना ५०व्या षटकादरम्यान घडली. बांगलादेशकडून श्रीलंकेच्या डावातील शेवटची ओव्हर तस्कीन अहमद करत होता. त्याच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर प्रमोदने शॉट खेळला. बॉल हवेत होता. हे पाहता अनामुल आणि झाकिर दोघेही बॉलच्या दिशेने धावले. या दरम्यान दोघांची टक्कर झाली. झाकिर दुखपतग्रस्त झाला. दरम्यान, अनामुलने कॅच घेतला. त्याला स्ट्रेचरवरून न्यावे लागले.
बांगलादेशचा खेळाडू सौम्य सरकारही दुखापतग्रस्त झाला. तो बॉल रोखण्याच्या प्रयत्नात जाहिरातीच्या बोर्डाला जाऊन धडकला. त्याची मान बोर्डाला आदळली. या पद्धतीने बांगलादेशचे एकूण चार खेळाडू दुखापतग्रस्त झाले.