मुंबई: सकाळी नेहमी हेल्दी आणि भरपूर ब्रेकफास्ट करण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य तज्ञांच्या मते सकाळी पाचनशक्ती मजबूत असते. अशातच योग्य पद्धतीने ब्रेकफास्ट करण्याने शरीराला भरपूर पोषण असते. दरम्यान, जर चुकीचे फूड्स खाल्ले तर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आरोग्यावर याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो.
चहा-कॉफी
लोक मानतात की सकाळी उठल्यानंतर गरमागरम चहा अथवा कॉफी प्यायल्याने मूड चांगला होतो. दरम्यान, तज्ञ असे न करण्याचा सल्ला देतात. त्यांचे म्हणणे आहे की रिकाम्या पोटी कधीही चहा अथवा कॉफी नाही प्यायली पाहिजे. यात कॅफेन असते. यामुळे अॅसिडिटी वाढण्यासोबतच ब्लड शुगर लेव्हलही वाढते.
मसालेदार ब्रेकफास्ट
आरोग्य तज्ञांच्या मते सकाळच्या वेळेस हलका फुलका तसेच कमी मसालेदार ब्रेकफास्ट खाल्ला पाहिजे. यामुळे जेवण अगदी सहज पचते आणि एनर्जी राहते. जेव्हा ब्रेकफास्टमध्ये मसालेदार पदार्थ खातो तेव्हा पोटाच्या आतड्यांना त्रास होतो. यामुळे बैचेनी आणि पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात.
आंबट फळे
संत्रे, लिंबूसारखी फळी सकाळच्या वेळेस खाऊ नयेत. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात. या फळांमध्ये सायट्रिक अॅसिड असते. जेव्हा आपण रिकाम्या पोटी ही फळे खातो तेव्हा पोटात अॅसिड बनू लागते. यामुळे अॅसिडिटी, पोट फुलण्याची समस्या जाणवते.
फळांचा ज्यूस
फळांचा ज्यूस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. सकाळी चुकूनही रिकाम्या पोटी पिऊ नये. यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्यास यामुळे नुकसान पोहोचते.