Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीThackeray Vs Shinde : निवडणुका जाहीर झाल्यानंतरही ठाकरे गटाला धक्का! आणखी एका...

Thackeray Vs Shinde : निवडणुका जाहीर झाल्यानंतरही ठाकरे गटाला धक्का! आणखी एका आमदाराने सोडली साथ

मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्या असून आता आचारसंहिताही (Code of conduct) लागू झाली आहे. त्यामुळे सर्व पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत आहेत. मात्र, या सगळ्यात ठाकरे गटाला (Thackeray group) अजूनही धक्के पचवावे लागत आहेत. शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून अनेकांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची साथ दिली. यानंतर आता पुन्हा एकदा एका आमदाराने ठाकरेंची साथ सोडली आहे. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आमश्या पाडवी हे ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा आहेत. आज आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्षप्रवेशासाठी जात असल्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मिडीया इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेला आहे. त्यांच्या अधिकृत पेजवरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.

आमश्या पाडवी गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत आहेत. पक्षफुटीनंतर ते ठाकरे गटात राहिले. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष तळागाळात पोहचवण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. २०२२ साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आमश्या पाडवी यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. मात्र, आज आमदार आमश्या पाडवी यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे हे शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.

महाविकास आघाडीत नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसला सुटणार असून मविआचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे आमश्या पाडवी हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी नंदुरबार लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली होती. मात्र मविआकडून तिकीट मिळत नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आता त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -