
'आज शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत' म्हणत राहुल गांधींवरही केली अप्रत्यक्ष टीका
मुंबई : काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) आज मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park, Dadar) सांगता होणार आहे. त्यासाठी मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राहुल गांधींसह (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) तसेच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी शिवाजी पार्कमधील सभेवरुन उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत. तसेच 'आज शिवाजी पार्कवर पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत' असं म्हणत राहुल गांधींवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे.
मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, आज शिवाजी पार्कवर तुम्हाला पाच गोष्टी ऐकू येणार नाहीत, त्या म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..., सावरकर वीर होते, आहेत आणि राहतील... मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही..., आम्ही समान नागरी कायद्याचे (UCC) समर्थन करतो..., ३७० कायदा रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन. एकूणच उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार असल्यावरून देवरांनी ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.
Five things you won't hear at Shivaji Park tonight 🎯 pic.twitter.com/CYQz3rUU11
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) March 17, 2024