प्रेम जगण्यातला श्वास...


  • मनस्विनी : पूर्णिमा शिंदे


प्रेम अद्भुत शक्ती, जगण्याची ताकद, बळ प्रेरणा. प्रेम अबोल, प्रीत, मिलन, स्नेह सहकार्य, भावभावना, काळजी म्हणजे प्रेम. सहवासाची आतुरता, आनंद, ओढ, लळा म्हणजे प्रेम. जीवन जगायला प्रेरणा देते ते प्रेम. अधीरता, आदर, आत्मीयता, जिव्हाळा म्हणजे प्रेम. जगण्यातला श्वास, मनातला आत्मविश्वास जिथे लाभतो ते खरे प्रेम. यश-अपयश, दुःख, कडू-गोड आठवणी यांची जाणीव साथसोबत करते ते प्रेम.



प्रेम म्हणजे काही केवळ स्वैराचार नाही बेडगी, हव्यास, फालतूपणा असे बरबटलेले घृणास्पद हे प्रेम होते का? ते काही बाजारीकरण नाही. व्यवहार नव्हे. अटीतटीचे पैजेचे जीवावर बेतणारे जीव घेणारे, याला प्रेम म्हणावे का? डील आहे का? भावनांचा खेळ मांडला! मनाचा ओलावा नष्ट करून भविष्याचा, आयुष्याचा भावभावनांचा चक्काचूर करणे. आपण समोरच्याच्या आयुष्याचा घात, विश्वासाघात करणे त्याच्या जीवनाशी खेळणे हे प्रेम असूच शकत नाही! प्रेम इतकं सुंदर अनमोल, अद्वितीय आहे की, या नात्यात सौंदर्य, मधुरता, उत्साही, सुंदर, उन्नती, प्रगतीकडे नेणारी, क्षणाक्षणाला हवीहवीशी वाटणारी अनुभूती म्हणजे खरं प्रेम.



सुखद क्षणांचा गारवा, भावनांचा ओलावा, हाती हात प्रेमाची साथ, नम्र, शुद्ध, सोज्वळ, सादगीपूर्ण, सौजन्य, सहकार्य यांची गुंफण म्हणजे नितळ प्रेम. सोनेरी, रूपेरी, चंदेरी अनुभव म्हणजे प्रेम. आधार, सामंजस्य, समर्पण, सहचार्य म्हणजे प्रेम. प्रेमाची उधळण इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाप्रमाणे उमलणारी फुलं, चैतन्यदायी प्रसन्न नैनांतून ओसंडून वाहणारे प्रेम चंद्रमा पुनवेचा, आकाशाचा चांदण्या, हिरवीगार बाग, खळखळून हसणं हृदयी प्रीत जागते म्हणून नयनातून ओसंडते प्रेमाचे प्रतीक गुलाबाचे फूल बेभान, बेधुंद करून टाकणारं, सारं जग विसरायला लावत ते प्रेम.



पातळी सोडू नये, नैतिकता सोडू नये, हृदय आयुष्य यांच्याशी खरे प्रेम. नाते निभवणारं असेही नातं आहे, यासाठी ही भाग्य लागतं. सप्तपदींच्या सात पावलांनी सात वचनांनी साथ शब्दांनी पवित्र बंधनामध्ये अडकूनसुद्धा आधार, समर्पण, सामंजस्य, विश्वास, जबाबदारी, आशा, स्नेह असे असावे पण खरे ते टिकते का? आपल्या हिंदू विवाह संस्कृतीमध्ये विवाहसंस्कार अत्यंत मोलाचा महत्त्वाचा आहे! ते निभावण्यासाठी सुद्धा लागते प्रेम!!



खरे नितळ, निर्मळ लाभण्यासाठी भाग्यच लागते. आज-काल लग्न काय किंवा प्रेम काय हे डील झाली आहे. ते बाजारीकरण झालेलं आहे. व्यवहार झालेला आहे. भावना बाजूला ठेवून एका गाठोड्यात बांधून केवळ आणि केवळ अटीतटीच्या पैजा लावून जीवनभर नीतिमूल्य पायदळी तुडवली जातात आणि असतो तो फक्त करार दोन जीवांचा, मनांचा, ऋणानुबंधांचा, मनोमिलनाचा आणि कुटुंबाचा वाताहत करणारा करार!!



खरं प्रेम तर जगायला शिकवते पण जीवनात काही अनुभव तर मरणयातनाहूनसुद्धा प्रक्षोभक, दाहक आणि घातक असतात. विश्वासघात करून स्वप्नांचा चक्काचूर करणारे असतात. याला मृगजळच म्हणावे दुसरे काय? खऱ्या प्रेमाला तहान-भूक नसते. त्यागामध्ये सर्वस्व उधळण्यामध्ये, नि:स्वार्थ प्रेम दडलेले असते आणि ते केवळ एक दिवस व्हॅलेंटाइन डेला साजरा करायचं नसतं, तर आयुष्यभर पुरेल अशी प्रेमाची अत्तराची कुपी हृदयामध्ये जवळ सांभाळून साठवून ठेवावीशी अशी सुंदर सोनेरी आठवण. कळीने उमलावे, फुलासाठी फुलाने उमलावे प्रीतीसाठी, अन् प्रीतीने उधळावे एकमेकांसाठी, अंत नसे प्रेमाला जे अजरामर, अविरत नित्य  निरंतर, विलक्षण ते वैविध्य बहुअर्थी, तेजस्वी चैतन्य ते नि:स्वार्थी, नसे उपमा प्रेमाला लाभे बहर जगण्याला...



प्रेम म्हणजे आयुष्याचा गोड तुरुंग... प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचे देणे खरंच तर इंद्रधनुचे सप्तरंग, गाण्याचे सप्तसूर, ओढ साता जन्माची, सात पावलांच्या सप्तपदीसम प्रेम असावे सातवचनांचे अतूट बंधन... रेशीमगाठ. हेच तर खरे प्रेम. देत राहिल्याने वाढतं त्याला प्रेम म्हणतात. देतानाच घ्यायचा असतो त्याला विश्वास म्हणतात आणि सारं जग विसरायला लावत त्याला आनंद म्हणतात...

Comments
Add Comment

क्रिकेटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर आज क्रिकेट सामन्याप्रसंगी तसेच नंतर ॲक्शन रिप्ले आणि हायलाईट्सच्या माध्यमातून

साहित्यातला दीपस्तंभ - वि. स. खांडेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय

ए मेरे दिल कहीं और चल...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येऊन गेलेलाच असतो की जेव्हा त्यावेळी

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे