Sunday, April 20, 2025
Homeक्राईमElvish Yadav : रेव्ह पार्टीप्रकरणी अखेर एल्विश यादवला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीप्रकरणी अखेर एल्विश यादवला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

उद्या न्यायालयात हजर करणार

नोएडा : युट्यूबर (Youtuber) आणि बिग बॉस ओटीटी २ (Bigg Boss OTT 2) चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) रेव्ह पार्टीप्रकरणी (Rave Party) नोएडा पोलिसांनी (Noida Police) यूट्यूबर एल्विश यादवला अटक केली आहे. सापाचे विष पुरवल्याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. यावेळी नोएडा पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. पोलीस गुप्त ठिकाणी एल्विश यादवची चौकशी करत आहेत.

डीसीपी नोएडा विद्या सागर मिश्रा यांनी सांगितले की, एल्विश यादवला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. दिल्ली-एनसीआरमधील पार्ट्यांमध्ये मनोरंजनासाठी सापाचे विष पुरवल्याप्रकरणी एल्विश यादव याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पशु कल्याण कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी एल्विश यादवचीही चौकशी केली असून या प्रकरणाचा तपास सुरू होता.

एल्विश यादवच्या पार्टीत साप आले कुठून?

या प्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना अटकही केली होती, ज्यामध्ये एल्विश यादवच्या पार्ट्यांमध्ये बदरपूर येथून साप आणल्याची माहिती आरोपींनी दिली होती. आरोपी राहुलने पोलिसांना सांगितले की, तो रेव्ह पार्ट्यांमध्ये साप आणि विषाची व्यवस्था करायचा, मागणीनुसार तो सर्पमित्र, प्रशिक्षक आणि इतर गोष्टी पुरवायचा. दिल्लीतील बदरपूरजवळील एका गावातून तो साप आणायचा, जो सर्पप्रेमींचा गड मानला जातो.

या प्रकरणात हरियाणवी गायक फाजिलपुरियाचेही नाव समोर आले आहे. या प्रकरणात, आरोपी राहुलच्या घरातून एक लाल डायरी जप्त करण्यात आली होती. ज्यामध्ये सॅम्पेरोचे नंबर, बुकिंग आणि पार्टीत सहभागी झालेल्या लोकांची नावे नोंदवली होती. एल्विश आणि फाजिलपुरिया यांच्या भेटीचा तपशीलही डायरीत नोंदवण्यात आला होता. डायरीत एल्विशच्या नोएडामधील फिल्मसिटी आणि छतरपूर येथील फार्म हाऊस पार्टीचाही उल्लेख होता. या डायरीमध्ये साप, विष, सर्पमित्र, बॉलीवूड आणि यूट्यूबसाठी रेव्ह पार्टीसाठी पाठवलेले प्रशिक्षक यांचा उल्लेख होता. डायरीच्या प्रत्येक पानावर पार्टीचा दिवस, आयोजकाचे नाव, ठिकाण, वेळ आणि पेमेंटचा तपशील लिहिलेला होता. यामुळे आता एल्विश चौकशीमध्ये आणखी काय काय उघड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -