Friday, May 9, 2025

कोलाजसाप्ताहिक

Crime News : खरा गुन्हेगार कोण?

Crime News : खरा गुन्हेगार कोण?

  • क्राइम : अॅड. रिया करंजकर


सोमनाथ हा ठाण्यामधला रहिवासी होता. आपल्या परिवाराचे पालनपोषण तो आपल्या नोकरीवर करत होता. तरीही वरची कमाई हवी आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची प्रगती करण्यासाठी तो गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होता. त्याच्याकडे दोन-तीन गाड्या होत्या. त्यामध्ये तो वरची कमाई कमवत असे. एक दिवस त्याच्याकडे अनोळखी दोन व्यक्ती आल्या व त्यांना गाडी तीन दिवसांसाठी पाहिजे असून अलिबाग, लोणावळा या ठिकाणी त्यांना फिरायला जायचं आहे, असं त्यांनी सांगितलं व आपला फोन नंबर त्यांनी दिला व अगोदरच ॲडव्हान्स रक्कम त्यांनी दिली. सोमनाथ यांनी त्यांचे काही डॉक्युमेंट्स घेऊन तीन दिवसांसाठी गाडी भाड्याने दिली आणि चावी त्यांना दिली. अनोळख्या व्यक्तीने गाडीची कागदपत्राची विचारणे केली असता, सोमनाथ याने गाडीच्या बॉक्समध्ये कागदाचे झेरॉक्स ठेवलेले आहेत, असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी म्हणजे अनोळख्या व्यक्तीने गाडी घेऊन आपला प्रवास सुरू केला.



तीन दिवस झाले तरी गाडी रिटर्न येईना म्हणून सोमनाथ याने त्या अनोळखी व्यक्तींना फोन केला असता त्यांचा फोन बंद येत होता. कदाचित ते ज्या ठिकाणी गेले असतील तिथे रेंज नसेल म्हणून फोन बंद असं सोमनाथला वाटलं. पाचवा दिवस आला तरी गाडी मिळाली नाही आणि ज्या व्यक्तीला आपण फोन करतोय त्या व्यक्तीचा फोन लागतही नाही. सोमनाथ याला कुठेतरी संशय येऊ लागला आणि सोमनाथ हा पोलीस स्टेशनला गेला व त्यांनी त्या ठिकाणी रितसर कंप्लेंट नोंदवली. तक्रार केल्यानंतर त्या गाडी क्रमांकाच्या गाडीचा शोध घेण्यात आला, तेव्हा असं कळलं की, ती कोल्हापूर हायवेच्या दिशेने गेली असल्याची टोलनाक्याच्या सीसीटीव्हीमध्ये दिसले आणि तो धागा पकडून पोलिसांनी गाडीचा तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांना ही गाडी कोल्हापूरमध्ये असल्याचं समजले. चौकशी केली असता पोलिसांना असं कळालं की, गाडी स्क्रॅपला विकलेली आहे व गाडीचा स्क्रॅप (भंगारात) करून टाकलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी ज्या व्यक्तीने विकत गाडी घेतली होती व ती गाडी स्क्रॅप करण्यात आली होती, त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी त्या स्क्रॅप करणाऱ्या अटकेत असलेल्या व्यक्तीने असं सांगितलं की, मला ठाणे आरटीओ यांनीही गाडी स्क्रॅप करण्यासाठी दिली आहे, अशा आशयाचे खोटे पत्र देऊन गाडी स्क्रॅप करायला दिली. व त्या बदल्यात ६० हजार रुपयांमध्ये ही गाडी विकत घेण्यात आलेली आहे.



चालू कंडीशनमध्ये असलेली गाडी अनोळखी व्यक्तीने कोल्हापूरमध्ये जाऊन स्क्रॅप करायचे असे सांगून ती भंगारत ६०००० रुपयाला विकली आणि विकत घेणाऱ्याने म्हणजे स्क्रॅप करणाऱ्याने ते झेरॉक्स पेपर बघितले आणि वर त्या अनोळखी माणसाने ठाणे आरटीओने दिलेले पेपर (खोटे पेपर) ही बघून ही गाडी विकत घेतली. यामध्ये त्या गाडीचं स्क्रॅप करूनही झालं.



पोलिसांनी ४११ भारतीय दंड संहिता या कलमांतर्गत चोरीची वस्ती खरेदी करणे आणि गाडी घेणाऱ्या व्यक्तीने स्क्रॅप त्याला अटक केली. यामध्ये ज्या व्यक्तीने त्या भंगारवाल्याला कागदपत्रे दाखवून फसवणूक केली होती. ती कागदपत्रे दाखवून स्क्रॅप करणाऱ्या व्यक्तीला जो अटकेत होता, त्याला जामिनावर सोडण्यात आले होते, स्क्रॅप करण्यामुळे आरोपी हा अज्ञात असून, त्याचा पत्ता अजून लागलेला नाही. जे खरोखरच गुन्हेगार आहेत, ज्याने सोमनाथकडून गाडी भाड्याने घेऊन सोमनाथची गाडी स्क्रॅपसाठी दुसऱ्याला विकली. ते दोन अनोळखी व्यक्ती खरे गुन्हेगार आहेत, ते पोलिसांना आजपर्यंत सापडलेच नाही व स्क्रॅप करण्यासाठी खोटी कागदपत्रे ज्या व्यक्तीला दाखवण्यात आली व त्या व्यक्तीने ती गाडी स्क्रॅप केली. तो मात्र या गुन्ह्यात फसला गेला. खरे गुन्हेगार मात्र मोकाट फिरत आहेत.



(सत्यघटनेवर आधारित)

Comments
Add Comment