नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election) घोषणेच्या एका दिवसानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) रविवारी कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यात त्यांनी आपल्या मंत्र्यांना नव्या सरकारच्या पुढील १०० दिवसांसाठीची कार्ययोजना आणि पुढील पाच वर्षांसाठीचा रोडमॅप तयार करण्याचे आदेश दिले.
पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना सांगितले की ते आपल्या अधिकारी तसेच सचिवांकडून मंत्रालयाच्या नव्या सरकारच्या निर्मितीआधी १०० दिवस आणि पुढील ५ वर्षांचा रोडमॅप तयार करून घ्या.
पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले की हे सरकार पुन्हा सत्तेत येत आहे यासाठी विकासाची कामे सातत्याने करत राहायला हवी. त्यांनी सांगितले की सरकार बनल्यानंतर पहिल्या १०० दिवसांचा तसेच ५ वर्षांचा अजेंडा काय असेल याचा रोडमॅप तयार केला जावा.
बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या मंत्र्यांना पुढील पाच वर्षांच्या रोडमॅपसोबत पुढील १०० दिवसांसाठी प्रमुख पैलू आणि डिलिव्हरेबल्सची रूपरेखा तयार करण्याचे काम सोपवले. कॅबिनेटची बैठक ही लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या ठीक एक दिवसांनी झाली. शनिवारी निवडणूक आयोगाने ७ टप्प्यात निवडणुकीची घोषणा केली. याचे निकाल ४ जूनला घोषित केले जातील.
देशातील ५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. यातील पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मेला, चौथा टप्पा १३ मेला, पाचवा टप्पा २० मेला, सहावा टप्पा २५ मेला, सातवा टप्पा १ जूनला होणार आहे.