Tuesday, April 29, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

आयपीएलचा दुसरा टप्पा भारता बाहेर

आयपीएलचा दुसरा टप्पा भारता बाहेर

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबईत सामन्यांची शक्यता

नवी दिल्ली : आयपीएल २०२४ चा पहिला भाग २२ मार्चपासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यातील पहिला सामना सीएसके आणि आससीबी यांच्यात चेन्नई येथे खेळवला जाईल, तर शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ७ एप्रिल रोजी खेळवला जाईल.

दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा दुसरा भाग भारताबाहेर आयोजित केला जाऊ शकतो, अशी अटकळ आता सुरू झाली आहे. बीसीसीआय आयपीएल २०२४ चा दुसरा टप्पा दुबईत आयोजित करण्याची योजना आखत आहे.

नुकत्याच १६ मार्चला भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करेल. सध्या बीसीसीआयचे काही उच्चपदस्थ अधिकारी या स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंचे पासपोर्ट घेतले आहेत, जेणेकरून जर आयपीएलचा दुसरा टप्पा दुबईत आयोजित केला गेला तर त्याची व्यवस्था लवकरात लवकर करता येईल. २०१४ च्या आयपीएलचा पहिला भाग देखील दुबईत निवडणुकीमुळे आयोजित करण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुसरा भाग दुबईत आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment