Sandesh Bendre : नाटकाचा संदेश देणारा नेपथ्यकार


  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल


एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या कामाने होते. कामातून ओळख निर्माण करणारा सर्जनशील नेपथ्यकार म्हणून त्याला नाट्यक्षेत्रातील लोक ओळखतात. नाटकात महत्त्वाचे अंग असते ते म्हणजे नेपथ्य. नेपथ्यकार म्हणून प्रसिद्ध असलेला व्यक्ती म्हणजे संदेश बेंद्रे. नाटकाचा महत्त्वाचा संदेश तो आपल्या नेपथ्यातून देत असतो.



चेंबूरच्या सरस्वती विद्यामंदिर शाळेत संदेशचे शिक्षण झाले. पुढे त्याने मेकॅनिकल इंजिनिअरला प्रवेश घेतला. त्याला ते रूचले नाही. त्याने पुण्याला इंटेरियर डिझायनरचा शॉर्ट कोर्स केला. तो विषय त्याला खूप आवडला. त्यामध्ये सर्जनशीलतेला वाव आहे. त्यामुळे हे त्याला आवडले. त्यानंतर मुंबईमध्ये त्याने इंटेरियर डिझायनरला डिप्लोमाला प्रवेश घेतला. त्यावेळी इंटेरियर डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला तो एका आर्किटेक्चरकडे पार्ट टाइम जॉब देखील करू लागला. तीन वर्षांचा तो इंटेरियर डिझायनरचा डिप्लोमा पूर्ण झाला. त्यावेळी त्याच्याकडे तीन वर्षांचा कामाचा अनुभव देखील होता. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये तो मंडपाचे डेकोरेशन देखील करू लागला होता. मुंबई महानगरपालिकेच्या गणेश दर्शन स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळांची तो सजावट करू लागला. वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन तो मंडळाची सजावट करू लागला. संदेश उपश्याम नावाचा मित्र एकदा त्याला म्हणाला की तू नेपथ्य चांगलं करू शकतोस, जर तू व्यवस्थित शिकलास तर. रघुवीर कलाशंकर हे ज्येष्ठ नेपथ्यकार त्याच्या नात्यातले होते. शिवाजी मंदिरला ‘टूर टूर’ हे नाटक त्याने पहिल्यांदा बघितले. त्या अगोदर नाटकाशी त्याचा काहीही संबंध नव्हता.



एकदा अभिनेता व दिग्दर्शक संतोष पवार नाटक करीत होते व त्यांना नवीन नेपथ्यकार हवा होता. संदेशने ती सुवर्णसंधी साधली. त्या नाटकाचे नेपथ्य करण्याचे काम त्याला मिळाले. नाटकाचे नाव होते ‘राधा कावरी बावरी’. हा त्याच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. पुढे त्याला नेपथ्य करण्याची कामे मिळू लागली. अभिनेत्री संपदा कुलकर्णीनी अंध-मुकी-बहिरी हेलन केलर वर एक नाटक करीत होती. ‘किमयागार’असे त्या नाटकाचे नाव होते. त्यात अमेरिकन घर दाखविण्यात आले होते. त्याचे काम त्याला मिळाले. त्या नाटकाचे परीक्षण लिहून आले. संदेशच्या नेपथ्याचे देखील कौतुक झाले. त्यानंतर शेखर ताम्हाणे लिखित ‘सांज भूल’ नाटक त्याने केले. त्याबद्दल संस्कृती कलादर्पणचे त्याला पारितोषिक मिळाले. पुण्यातला जुन्या वाड्याचा सेट उभारला होता व अंगणात खरा पाऊस पाडला जात होता.



त्यानंतर दुसरा टर्निंग पॉइंट म्हणजे त्याला मिळालेले सुयोग संस्थेचे नाटक ‘अनन्या’ होय. या नाटकामध्ये घर, ऑफिस, बस स्टॉप असे सेट लावले गेले. या नाटकाला खूप पारितोषिक मिळाले. संदेशला देखील महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक, झी गौरव, सांस्कृतिक कला दर्पण पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘फुलराणी’, ‘हिमालयाची सावली’ नाटक त्याने केले. ‘हे मृंत्युजय’, ‘महारथी’ या नाटकातील कामासाठी त्याला अवॉर्ड मिळाले. त्यानंतर ‘सफरचंद’, ‘चाणक्य’ नाटकातील त्याच्या कामाचे कौतुक झाले. ‘२१७ पद्मिनी धाम’, ‘फ्रेंड रिक्वेस्ट’, ‘जर तरची गोष्ट’, ‘चारचौघी’, ‘कुर्रर्रर्र’ ही सध्या त्याची नाटके सुरू आहेत. नेपथ्यामधील वेगवेगळी आव्हाने पेलून चांगले सेट निर्माण करण्याची किमया साधणाऱ्या संदेशला भविष्यकालीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

राजरंग : राज चिंचणकर नाटक हे नाटक असते आणि नाटकांच्या बाबतीत व्यावसायिक व प्रायोगिक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी

‘गोदावरी’तील समावेश कलाटणी देणारा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल गौरी नलावडे या अभिनेत्रीचा ‘वडा पाव’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. गौरीचे शालेय

कलात्मक दिग्दर्शक गुरुदत्त

गुरुदत्त हिंदी चित्रपटसृष्टीत जिवंतपणीच आख्यायिका बनलेले व्यक्तिमत्त्व. आजही गुरुदत्त यांचे नाव घेतले की

नाईलाजांच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

पाचवा वेद : भालचंद्र कुबल यालेखाचं शीर्षक मुद्दामहून हेच ठेवण्यामागचं कारण असं की परीक्षक म्हणून एकदा का तुम्ही

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता