Thursday, July 3, 2025

MVA : मविआमध्ये अजूनही जागावाटपावरुन धुसफूसच!

MVA : मविआमध्ये अजूनही जागावाटपावरुन धुसफूसच!

काँग्रेस आणि ठाकरे गट दोन जागांवर आग्रही


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा आज जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच डोळे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दुपारच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहेत. दरम्यान, तारखा जाहीर होण्याची वेळ आली तरी महाविकास आघाडीमधील (MVA) जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लोकसभेसाठी सर्व राजकीय पक्ष (Political Parties) कंबर कसून तयारी करत आहेत. मात्र, आता निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या असातानाही मविआमध्ये जागावाटपावरुन धुसफूसच सुरु आहे.


मविआचे काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गट (Thackeray Group) दोन जागांवर आग्रही आहेत. सांगली (Sangli) आणि रामेटक (Ramtek) या दोन जागांवरील तिढा कायम आहे. या दोन्ही जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. या जागांवरती काल चर्चा झाली होती, मात्र मार्ग निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा यावर चर्चा होणार आहे.

Comments
Add Comment