Friday, November 8, 2024
Homeताज्या घडामोडीSchool teachers : राज्यातील सर्व शाळांच्या शिक्षकांना आता लागू होणार ड्रेसकोड!

School teachers : राज्यातील सर्व शाळांच्या शिक्षकांना आता लागू होणार ड्रेसकोड!

शिक्षकांचे स्टेटस वाढणार; नावाआधी लागणार ‘Tr’

शालेय मंत्री दीपक केसरकरांच्या महत्त्वाच्या घोषणा

मुंबई : राज्यातील सर्व शाळांच्या शिक्षकांसाठी (School teachers) राज्य सरकारने (Maharashtra Government) काही मोठे निर्णय घेतले आहेत. शालेय मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी यांसबंधीची माहिती दिली. त्यानुसार आता राज्यातील प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी ड्रेस कोड (Dress code) लागू होणार आहे. त्यामुळे शाळेत असताना शिक्षकांना टी-शर्ट किंवा जीन्स पँट परिधान करता येणार नाही. त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी एक खुशखबर देखील आहे. शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr) आणि मराठीत टि असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचे स्टेटस वाढणार आहे.

नवीन नियमानुसार, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरूष व महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल अशा रंगाच्या ड्रेसकोडचे पालन करणे बंधनकारक असेल. महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव असावा. तर पुरूष शिक्षकांना शर्ट-ट्राउझर पँट घालावी लागेल. शर्ट इन असावा तसेच गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत. तसेच शिक्षकांनी जीन्स टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सरकारने घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिम्बॉल होणार आहे. शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr) आणि मराठीत टि असे संबोधन लावण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. व ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड. संबोधन लावण्यात येते, त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या वाहनावर देखील हे संबोधन व त्याअनुरूप बोधचिन्ह लावण्याची परवानगी देण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -