
मुंबई: देशातील प्रसिद्ध बिझनेस शो शार्क टँक इंडियाला मोठी पसंती मिळत आहे. येथे स्टार्टअप्स आणि नव्या आयडियाज घेऊन लोक येतात. शार्क टँकचे परीक्षक त्यांना पाहून ऐकून डील करतात.
या शोमध्ये दिग्गज कंपन्यांचे फाऊंडर शार्क टँकचे परीक्षक म्हणून भूमिका निभावतात. मात्र ते ही प्रचंड श्रीमंत आहेत.
या शोची एक परीक्षक आहे नमिता थापर जी एमक्योर फार्मास्युटिकल लिमिटेडची सीईओ आहे. लक्झरी लाईफस्टाईल जगणारी नमिता थापर आपले पती विकास थापर यांच्यासोबत पुण्यामध्ये ५० कोटींच्या घरात राहते.
एका रिपोर्टनुसार तिच्या घरावरूनच तिच्या श्रीमंतीचा अंदाज येणार नाही तर तिच्या राहण्यावरूनही ती किती लक्झरी लाईफ जगते याचा अंदाज येईल. ती तब्बल २० लाखांच्या चपला वापरते.
शार्क टँकच्या एका एपिसोडदरम्यान परीक्षक अमित जैन यांनी नमिता थापर २० लाखांच्या चपला वापरत असल्याचा दावा केला आहे.
नमिता यांच्या कार कलेक्शनमध्ये BMW X7, मर्सिडिज बेंझ GLE आणि ऑडी Q7 सारख्या महागड्या आणि लक्झरी कारचा समावेश आहे.