Thursday, July 18, 2024
Homeदेशपेट्रोल-डिझेलचे दर २ रूपयांनी झाले स्वस्त, सकाळपासून नवे दर लागू

पेट्रोल-डिझेलचे दर २ रूपयांनी झाले स्वस्त, सकाळपासून नवे दर लागू

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने लोकांना दिलासा देत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत २ रूपयांनी कपात केली आहे. कमी झालेले दर १५ मार्चपासून सकाळी ६ वाजल्यापासून लागू होत आहेत. तर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २ रूपयांनी कपात करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सिद्ध केले की कोट्यावधी भारतीयांच्या कुटुंबांचे हित आणि सुविधा हेच त्यांच्यासाठी प्राधान्य आहे.

ते म्हणाले जेव्हा जगात कठीण काळ सुरू होता. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत ५०-७२ टक्के वाढ झाली होती. आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांमध्ये पेट्रोल मिळणे बंद झाले होते. ५० वर्षातील सर्वात मोठे तेल संकट आलेले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी आणि सहज नेतृत्वामुळे देशावर कोणतेही संकट आले नाही.

पेट्रोलचे दर

नवी दिल्ली – आधीचे दर ९६.७२ रूपये
आताचे दर ९४.७२ रूपये

मुंबई – आधीचे दर १०६.३१ रूपये
आताचे दर १०४.२१ रूपये

कोलकाता – आधीचे दर १०६.०३ रूपये
आताचे दर १०३.९४ रूपये

चेन्नई – आधीचे दर १०२.६३ रूपये
आताचे दर १००.७५ रूपये

डिझेलचे दर

नवी दिल्ली – आधीचे दर ८९.६२ रूपये
आताचे द ८७.६२ रूपये

मुंबई – आधीचे दर ९४.२७ रूपये
आताचे दर ९२.१५ रूपये

कोलकाता – आधीचे दर ९२,७६ रूपये
आताचे दर ९०.७६ रूपये

चेन्नई – आधीचे दर ९४.२४ रूपये
आताचे दर ९२.३४ रूपये

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -