नवी मुंबई(प्रतिनिधी) -नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने ऐरोली से-१० ए येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृची पुतळयाचा, शिलान्यास समारंभ आणि ऐरोली, घणसोली पामबीच मार्गावर खाडीपूल बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने कारण्यात आलेय.
ऐरोली घणसोली मार्ग जोडल्याने ठाणे बेलापूर मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतुन मुक्तता होणार आहे.यासोबतच ऐरोलीत भव्य शिव स्मारक उभं राहत असल्याने ऐरोली विभागातील प्रत्येक नागरिक आनंदित आहे. यावेळी ऐरोलीकरांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष नवी मुंबईचे डॅशिंग नेतृत्व विजय चौगुले यांचे आभार व्यक्त केले.
तसेच ऐरोली येथील अग्निशामन केंद्राच्या उद्घाटन, महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात नव्याने निर्माण होणारे प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच निर्माण झालेल्या वास्तूंचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.