Monday, October 20, 2025
Happy Diwali

Ayodhya: राम नवमीला २४ तास खुले राहणार राम मंदिर, दर्शन करणाऱ्यांसाठी भक्तांसाठी खास सोय

Ayodhya: राम नवमीला २४ तास खुले राहणार राम मंदिर, दर्शन करणाऱ्यांसाठी भक्तांसाठी खास सोय

अयोध्या : अयोध्येमध्ये राम मंदिराच्या(ram mandir) लोकार्पणानतर राम नवमीनिमित्त श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. यासाठी योगी सरकार तयारीमध्ये व्यस्त आहे. या निमित्त गर्दीची योग्य व्यवस्था साांभाळण्यासाठी खास प्लान तयार केला जात आहे. यावेळेस राम नवमी १७ एप्रिलला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामनवमीला राम मंदिराच्या दर्शनासाठी तास खुले ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर तयारी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनासाठी दिवसभर मोठी लाईन असतानाही कोणालाही २.५ किमीपेक्षा जास्त चालायला लागू नये यासाठीही सोय करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय आणि बऱ्याच ठिकाणी शेडची व्यवस्था केली जाणार आहे. दर्शनानंतर भक्तांना बाहेर जाण्यासाठी प्लान तयार करण्यात आला आहे.

राम नवमीला २४ तास खुले राहणार राम मंदिर

दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक राम नवमीच्या एक दिवस आधी अष्टमीला आणि एक दिवसानंतर दशमी तिथीला राम मंदिर २४ तास खुले राहणार आहे. श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेनंतर पहिल्यांदा राम जन्मोत्सव असल्याने राम नवमीला संपूर्ण अयोध्येत विशेष तयारी केली जात आहे.

यावेळेस काशी विश्वनाथ मंदिर महाशिवरात्रीला २४ तास खुले ठेवण्यात आले होते. एक दिवसात ११ लाख ५५ हजार लोकांनी मंदिरात दर्शन घेतले होते. राम मंदिरा लोकापर्णानंतर आतापर्यंत १ कोटीहून अधिक लोकांनी श्रीरामांचे दर्शन घेतले आहे.

Comments
Add Comment