Friday, July 19, 2024
Homeक्रीडाVIDEO: बॅटिंग सोडून क्रिकेटच्या मैदानात नमाज पठण, पाणी पिऊन, खजूर खाऊन सोडला...

VIDEO: बॅटिंग सोडून क्रिकेटच्या मैदानात नमाज पठण, पाणी पिऊन, खजूर खाऊन सोडला रोजा

मुंबई: क्रिकेटच्या मैदानावर फार कमी वेळा असे पाहायला मिळते की एखादा सामना मध्येच थांबवून क्रिकेटर नमाज पठण करत असतील. मात्र असे घडले आहे जेव्हा लाईव्ह क्रिकेट सामन्या दरम्यान सामना मध्येच थांबवला जातो आणि बॅटिंग करत असलेले फलंदाज गुडघ्यावर बसून नमाज पठण करतात आणि त्यानंतर रोजा सोडतात.

जेव्हा हे खेळाडू मैदानावर सगळ्यांसमोर असे करत असतात तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये त्यांचे सहकारी खेळाडूही रोजा सोडताना दिसत आहे. क्रिकेटर्सचा मैदानावरील इफ्तारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

 

अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेचा तिसरा आणि शेवटचा वनडे सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. हा सामना अफगाणिस्तानने ११७ धावांनी जिंकत मालिकेत २-० असा विजय मिळवला. मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला.

तिसऱ्या वनडेत जेव्हा अफगाणिस्तानचे फलंदाज हशतुल्लाह शाहिदी आणि मोहम्मद नबी फलंदाजी करत होते त्यावेळेस वेगळेच दृश्य मैदानावर पाहायला मिळाले. अंपायरने जेव्हा लाईव्ह सामना काही काळ थांबवला तेव्हा कोणालाच काही कळले नाही की काय झाले. यानंतर लगेचच बॅटिंग करत असलेले शाहिदी आणि नबी बॅट आणि ग्लव्हज काढून गुडघ्यावर मैदानात बसले. यानंतर त्यांनी आधी नमाज पठण केले आणि खजूर खात आपला रोजा सोडला.

रमजानचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव सकाळी खातात. त्यानंतर दिवसभर उपवास करतात. यादरम्यान काहीही खाल्ले अथवा प्यायले जात नाही. त्यानंतर संध्याकाळी सूर्यास्तानंतर रोजा सोडला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -