प्रकृतीबाबत रुग्णालयाने दिली मोठी अपडेट
पुणे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Former president Pratibhatai Patil) यांना पुणे (Pune) शहरातील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप आणि छातीत जंतुसंसर्गामुळे (Fever and chest infection) त्यांना त्रास होऊ लागला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुविधेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रतिभाताई पाटील यांना बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ताप आणि छातीत संसर्गाची तक्रार होती. त्या ८९ वर्षांच्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत, असे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्यांनी २००७ ते २०१२ या काळात राष्ट्रपतीपद भुषविले. १९६२ मध्ये त्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर मतदारसंघातून प्रथमच विधानसभेमध्ये निवडून गेल्या होत्या. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पती देवीसिंग शेखावत यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.