Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीBJP Vs Thackeray : ठाकरेंना मोठा धक्का देत कलाबेन डेलकर भाजपच्या साथीला

BJP Vs Thackeray : ठाकरेंना मोठा धक्का देत कलाबेन डेलकर भाजपच्या साथीला

पतीच्या आत्महत्येनंतर ठाकरे गटाने दिली होती उमेदवारी

मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाची (Thackeray Group) परिस्थिती मात्र अत्यंत बिकट होत चालली आहे. अनेक मोठमोठ्या नेत्यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर आता मुंबई आणि महाराष्ट्राबाहेरही नेते ठाकरे गटाची साथ सोडत आहेत. ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या दादरा नगर हवेलीच्या (Dadra & Nagar Haveli) खासदार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे, हे स्पष्ट झालं आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जी दुसरी यादी जाहीर केली, त्यामध्ये अनेक दिग्गज नावांसोबत दादरा नगर हवेलीमधून कलाबेन डेलकर यांच्या नावाची घोषणा केली. शिवसेनेच्या डेलकर यांना भाजपच्या यादीत स्थान मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

डिसेंबर २०२३ मध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) हे दादरा नगर हवेलीच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कलाबेन डेलकर यांनी त्यांची भेट घेतली होती, तसेच शाहांच्या स्टेजवरही त्या दिसून आल्या होत्या. त्यानंतर कलाबेन डेलकर या भाजपसोबत जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता भाजपने आपल्या उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करत ठाकरे गटाला शह दिला आहे.

पतीच्या आत्महत्येनंतर ठाकरे गटाने दिली होती उमेदवारी

कलाबेन डेलकर यांचे पती मोहन डेलकर (Mohan Delkar) यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर दादरा नगर हवेलीच्या प्रशासकाविरोधात आरोप करत कलाबेन डेलकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. २०२२ साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्या निवडूनही आल्या होत्या. पण कलाबेन डेलकर यांनी त्यांची साथ सोडून भाजपची उमेदवारी मिळवली आहे.

कोण होते मोहन डेलकर?

दिवंगत खासदार मोहन डेलकर हे लोकसभा निवडणुकीत सात वेळेस निवडून आले होते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहन डेलकर यांनी भाजप खासदार नथुभाई पटेल यांचा ९००० मतांनी पराभव केला होता. मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारी २०२१ रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -