
विराट कोहली १९ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला जॉईन करू शकतो. कारण या तारखेला टीमचा अनबॉक्स शो असेल. कोहली शेवटचा अफगाणिस्तानविरुदध खेळवण्यात आलेल्या टी-२० मालिकेत दिसला होता. त्यानंतर तो लंडनच्या रस्त्यांवर दिसला होता.
दरम्यान, आरसीबी अथवा विराट कोहली यांनी कोणीही कन्फर्म केलेले नाही की तो १९ मार्चला संघासोबत दिसेल की नाही. याशिवाय याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही की कोहली आयपीएल २०२४मध्ये खेळणार की नाही. कारण तो बऱ्याच दिवसांपासून दिसलेलाही नाही.
आयपीएलनंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळवला जाणार आहे. यातही कोहलीच्या निवडीवर सवाल केले जात आहे. असे म्हटले जात आहे की त्याला टी-२० वर्ल्डकप संघापासून दूर ठेवले जाऊ शकते.