Tuesday, July 1, 2025

Grapes: एका दिवसांत किती द्राक्षे खावीत? कधी आणि कशी खावीत घ्या जाणून

Grapes: एका दिवसांत किती द्राक्षे खावीत? कधी आणि कशी खावीत घ्या जाणून

मुंबई: हल्ली बाजारात द्राक्षे मोठ्या प्रमाणात येतात. द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे एक प्रकारचे पोषकतत्वांचे भांडार आहे. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज ज्यामुळे इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते. द्राक्षांमध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स असतात जे रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखतात. तसेच हाडेही मजबूत राखण्याचे काम करतात. द्राक्षे खाल्ल्याने हे सारे पोषकतत्वे मिळतात. मात्र द्राक्षे खाण्याची योग्य वेळ, प्रमाण आणि पद्धत याची काळजी घेतली पाहिजे.



कधी खाल्ली पाहिजेत द्राक्षे?


द्राक्षे ही रसदार फळांपैकी एक आहेत. द्रांक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. द्राक्षे खाण्याची योग्य वेळ दुपारी जेवणाच्या आधी आहे. सकाळी रिकाम्या पोटी कधीही द्राक्षे खाऊ नयेत. रिकाम्या पोटी द्राक्षे खाल्ल्याने पोटात गॅस, आंबट ढेकर आणि पचनासंबंधी समस्या होतात. रात्रीच्या वेळेसही द्राक्षे खाऊ नयेत. द्राक्षे खाण्याची योग्य वेळ सकाळी आणि दुपारी असते.



दिवसभरात किती द्राक्षे खावीत?


आयुर्वेदानुसार एका दिवसांत दीड ते दोन कप द्राक्षे खाऊ शकता. अधिक प्रमाणात द्राक्षे खाल्ल्यास आरोग्यास नुकसानदायक ठरू शकतात. द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात.



द्राक्षे खाण्याची योग्य पद्धत


द्राक्षे खाण्यापूर्वी ती व्यवस्थित धुवावीत. त्याशिवाय खाऊ नयेत. द्राक्षे मीठाच्या पाण्यात कमीत कमी २० मिनिटे ठेवावीत. त्यानंतर व्यवस्थित धुवून मगच खावीत.

Comments
Add Comment