Tuesday, July 1, 2025

या ३ घरांमध्ये स्वत:येते लक्ष्मी माता, नेहमी राहतो आनंद

या ३ घरांमध्ये स्वत:येते लक्ष्मी माता, नेहमी राहतो आनंद

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा तीन घरांचे वर्णन केले आहे जिथे माता लक्ष्मी स्वत:चालत येते आणि आपला वास करते. चाणक्य यांच्या मते या घरात राहणाऱ्या व्यक्ती नेहमी खुश असतात. कधीच त्यांना कसली चणचण भासत नाही


आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरांमध्ये अन्नाचा नेहमी सन्मान केला जातो. तेथे कोणत्याची गोष्टीची कमतरता भासत नाही. धनदेवी माता लक्ष्मीची कृपा नेहमी त्यांच्यावर राहते.


ज्या घरांमध्ये अन्नाचा सन्मान केला जात नाही अथवा तेथे खूप अन्न टाकले जाते तेथे माता लक्ष्मी अथवा अन्नपूर्णा देवीचा वास नसतो.


ज्या घरांमध्ये ज्ञानी व्यक्तींचा सन्मान केला जात नाही तेथे माता लक्ष्मीचा कधीही वास नसतो. घरामध्ये नेहमी ज्ञानी व्यक्तींचा सन्मान झाला पाहिजे. अशा घरात लक्ष्मी माता स्वत: येते.


ज्या घरात पती-पत्नी प्रेमाने राहतात तसेच एकमेकांचा सन्मान करतात तेथे नेहमी सकारात्मकता राहते. अशा घरात नेहमी लक्ष्मी मातेचा वास असतो. सोबतच कुटुंबात नेहमी आनंद असतो.

Comments
Add Comment