IPL आधी KKRला मोठा झटका, हा खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग(IPL)च्या १७व्या हंगामाची सुरूवात २२ मार्चपासून होत आहे. आयपीएल २०२४च्या सुरूवातीआधीच कोलकाता नाईट रायडर्सचे टेन्शन वाढले आहे.


संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. मुंबई-विदर्भ यांच्यात रंगलेल्या रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात श्रेयसला पाठीला दुखापत झाली. श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे रणजी फायनलच्या चौथ्या तसेच पाचव्या दिवशी फिल्डिंगसाठी उतरला नाही.


मीडिया रिपोर्टनुसार श्रेयस अय्यर आता पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२४च्या सुरूवातीच्या सामन्यातून बाहेर गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार श्रेयसचे पाठीचे दुखणे पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये तो खेळण्याची शक्यता कमी आहे.


रणजी ट्रॉफीच्या फायनलदरम्यान मुंबईच्या दुसऱ्या डावात श्रेयसने ९५ धावा केल्या. त्याच्या या खेळी दरम्यान त्याचे पाठीचे दुखणे पुन्हा उफाळून आले.


श्रेयस पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी संपूर्ण आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. एप्रिलमध्ये त्याच्या पाठीची सर्जरी झाली होती. यानंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर गेला होता.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६, महासंग्राम भारतात शुक्रवारपासून दिसणार

Mexico : अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली फिफा विश्वचषक २०२६ या फुटबॉलच्या महासंग्रामाला

IND vs AFG : ऐतिहासिक पदार्पणानंतर मानव सुथारचे नशिब खुलले ? विदेशी टीमकडून खेळण्याची संधी ?

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात शानदार पदार्पण करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारताच्या युवा

Fifa World Cup 2026 Prize Money : विश्वविजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव ! प्रत्येक पात्र संघ कोट्यवधी रुपये जिंकेल; कोणाला किती कोटी रुपये मिळतील?

मुंबई : फुटबॉल जगतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे फिफा विश्वचषक. फिफा विश्वचषक २०२६ उद्यापासून म्हणजेच ११

Srishti Kiran : जागतिक अंडर-१३ टेनिस रँकिंगमध्ये अव्वल स्थान!

बंगळुरूची उदयोन्मुख टेनिसपटू सृष्टी किरण हिने जागतिक टेनिसमध्ये नवा इतिहास रचला आहे. सलग पाच आयटीएफ (ITF) ज्युनियर

Australian Open : पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मा यांची विजयी घोडदौड; महिला एकेरीत भारतीय खेळाडूंची आगेकूच

Sydney : सिडनी येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

Hardik Pandya : आधी फिट त्यानंतर अनफिट ! अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून हार्दिक बाहेर, रोहित शर्मा सज्ज ?

Bangalore : भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. पहिला विराट त्यानंतर आता