Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीराम मंदिरातील आरतीचे दूरदर्शन करणार थेट प्रेक्षपण

राम मंदिरातील आरतीचे दूरदर्शन करणार थेट प्रेक्षपण

नवी दिल्ली : दूरदर्शनने सांगितले की, “डीडी नॅशनल दररोज सकाळी ६.३० वाजता होणारी रामलल्लाची ‘आरती’ थेट प्रसारित करणार आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “प्रभू रामाच्या भक्तांची अपार श्रद्धा लक्षात घेऊन ही सुविधा दिली जाणार आहे. आता, तुम्हाला दररोज घरबसल्या प्रभू श्री रामाचे दर्शन घेता येईल,” ठाकूर यांनी एक्स वर पोस्ट केले की, “रामभक्तांची भगवान श्री रामावरील अपारश्रद्धा लक्षात घेऊन, प्रसार भारतीने हा निर्णय घेतला आहे. ही खूप मोठी सुविधा आहे.”

दूरदर्शवर दररोज धार्मिक कार्यक्रम प्रसारित करण्यामागील तर्काबद्दल माहिती देताना प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी म्हणाले की, दूरदर्शनवर वेळोवेळी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दिनदर्शिकेनुसार कार्यक्रम चालवले जातात. आता, रामनवमी जवळ आली आहे आणि राममंदिराच्या उद्घाटनानंतर, आरती प्रसारित करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे आम्हाला वाटले. या दृष्टीकोनामुळे आम्ही (श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र) ट्रस्टला त्यासाठी विनंती केली आणि त्यांनी संमती दिली. सुरुवातीला प्रसार भारती काही महिन्यांसाठी “मंगल आरती” प्रसारित करेल आणि नंतर ती पुढे कशी न्यावी यावर राम मंदिर ट्रस्ट निर्णय घेईल.

अयोध्येमधील राममंदिरमध्ये दि. २२ जानेवारी रोजी प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -