Saturday, July 13, 2024
HomeUncategorizedमसाला-आधारित न्यूट्रास्युटिकल्समधील संशोधन, नवोन्मेषामध्ये वाढ करण्याच्या संधी

मसाला-आधारित न्यूट्रास्युटिकल्समधील संशोधन, नवोन्मेषामध्ये वाढ करण्याच्या संधी

श्रीमती टी. श्रावणी

मसाला-आधारित न्यूट्रास्युटिकल्समधील संशोधन आणि नवोन्मेषामध्ये वाढ करण्याच्या आशादायक संधी संशोधक उद्योजक, धोरणकर्ते आणि ग्राहक अशा विविध भागधारकांसाठी आहेत. अनेक मसाल्यांना समृद्ध सांस्कृतिक वारसा असून, जगभरातील विविध पाककला आणि औषधी पद्धतींमध्ये त्यांचा पारंपरिक वापर आहे. स्थानिक पद्धतींचा आदर राखत शाश्वत स्रोत आणि उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन देऊन संशोधनाचा विस्तार वाढवल्यास या पारंपरिक ज्ञानाचे प्रमाणीकरण आणि विकास होण्यास मदत होऊ शकते.

भारतातील न्यूट्रास्युटिकल क्षेत्राच्या विकासात मसाल्याच्या उद्योगाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. न्यूट्रास्युटिकल्स, ज्यांना त्यांच्या पौष्टिक मूल्याच्या पलीकडे जाऊन आरोग्य आणि औषधी फायदे प्रदान करणारी उत्पादने म्हणून परिभाषित केले आहे, त्यांना अलीकडच्या काळात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेबद्दलच्या वाढत्या जागरूकतेमुळे मोठी लोकप्रियता प्राप्त झाली आहे. मसाले चवदार आणि आकर्षक असतात, याव्यतिरिक्त, त्यांच्यामध्ये बायी-अॅक्टिव्हट्न देखील असतात, जे न्यूट्रास्युटिकल्स म्हणून कार्य करतात आणि ते विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांवर परिणामकारक असल्याचेही आढळले आहे. हळद, जायफळ, मिरी, बादियाना, आले, लसूण, धणे, जिरे, दालचिनी, मेथी यांसारखे मसाले फार पूर्वीपासून वापरले जात आहेत. त्यांचे वैद्यकीय फायदे सिद्ध झाले आहेत. संशोधन सूचित करते की, अनेक मसाल्यांमध्ये जैव सक्रिय संयुगे असतात, ज्यात संभाव्य आरोग्य फायदे असतात, जसे की दाह-विरोधी, अॅन्टीऑक्सिडेंट, प्रतिजैविक आणि अगदी कर्करोगविरोधी गुणधर्म. संशोधन वाढल्यास नवीन आरोग्य फायदे आणि कृतीयंत्रणा उजेडात येण्यास मदत होऊ शकेल ज्यामुळे न्यूट्रास्युटिकल उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार होईल.

मसाला उद्योगाचा न्यूट्रास्युटिकल क्षेत्रावरील आर्थिक प्रभाव
भारतातील न्यूट्रास्युटिकल क्षेत्रावर मसाल्याच्या उद्योगाचा महत्त्वपूर्ण आर्थिक प्रभाव पडला आहे. मसाल्यांचे उत्पादन आणि निर्यात हा भारतातील लाखो लोकांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील रोजगार आणि उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. मसाला-आधारित न्यूट्रास्युटिकल उत्पादनाच्या वाढत्या मागणीने मसाला उद्योगासाठी नवीन संधी निर्माण केल्या आहेत आणि भारतातील न्यूट्रास्युटिकल क्षेत्राच्या वाढीस हातभार लावला आहे. हळदीतील कर्क्युमिन, काळी मिरीमधील पायपेरिन, लवंग आणि दालचिनीमधील युजेनॉल, आल्यामधील जिंजरौल आणि दालचिनीमधील सिनामन्डिहाइड हे सक्रिय घटक त्यांची विशिष्ट चव, सुगंध आणि स्वयंपाक तसेच औषधी क्षेत्रातील आरोग्य फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखले जातात.

कर्क्युमिन हे त्याच्या शक्तिशाली अॅन्टिऑक्सिडेंट आणि दाह-विरोधी गुणधर्मासाठी पारंपरिक औषधामध्ये प्रसिद्ध आहे, ते दाह कमी करण्यास आणि सांध्यांच्या आरोग्यास बळकटी देण्यास मदत करते. तर पायपेरिन हे पोषक घटकांच्या शोषणात सुधारणा, दाहविरोधी परिणाम आणि संभाव्य कर्करोगविरोधी गुणधर्माशी संबंधित आहे. युजेनॉल आणि जिंजरॉल त्यांच्या अॅन्टिऑक्सिडंट, दाहविरोधी आणि सूक्ष्मजंतूविरोधी गुणधर्मासाठी महत्त्वपूर्ण असून, विविध आरोग्य फायदे देतात. दरम्यान, दालचिनीला त्याची वैशिष्ट्यपूर्ण गोड आणि मसालेदार चव देणारे सिनामल्डहाइड हे रक्तातील साखरेचे संभाव्य नियमन करण्याशी निगडीत आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेत मसाला उद्योगाचाही मोठा वाटा आहे. मसाले हे देशातील प्रमुख कृषी निर्यातीपैकी एक आहेत आणि हा उद्योग भारतासाठी परकीय चलनाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. मसाला-आधारित न्यूट्रास्युटिकल उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे भारतातील न्यूट्रास्युटिकल क्षेत्रावरचा मसाला उद्योगाचा आर्थिक प्रभाव वाढला आहे.
न्यूट्रास्यूटिकल उत्पादनांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या उत्पादनाची निर्मिती आणि वितरणासाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे भारतातील न्यूट्रास्युटिकल क्षेत्राच्या एकूण वाढीस हातभार लागला आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत मसाले मंडळाच्या माध्यमातून मसाल्यांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी, विविध अनुप्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी, बाजारपेठेतील हिस्सा मजबूत करण्यासाठी केंद्रित हस्तक्षेपांद्वारे पावले उचलत आहे. भारतातील ई-कॉमर्स उद्योगाचा विस्तार आणि किरकोळ आस्थापनांमध्ये नाशवंत ग्राहकोपयोगी उत्पादनांची वाढती उपलब्धता यामुळे भारतीय मसाला बाजाराच्या विस्तारास चालना मिळेल. या उपक्रमांमुळे भारतातील बाजारपेठेच्या विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील. मसाला-आधारित न्यूट्रास्यूटिकल उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे न्यूट्रास्युटिकल क्षेत्राने या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

बाजारपेठ विकास आणि मसाला -आधारित न्यूट्रास्युटिकल्स
न्यूट्रास्युटिकल क्षेत्रातील औषधी मसाल्यांच्या मागणीतील वाढ हे बाजारपेठेतील चैतन्याचे प्रमुख कारण ठरले असून, त्यामुळे बाजाराचा विकास होत असल्याचे दिसून येत आहे. २०२२ मध्ये हर्बल न्यूट्रास्युटिकल्सच्या बाजाराचा आकार ५५ अब्ज अमेरिकन डॉलर एवढा होता आणि २०२३ पासून २०३२ पर्यंत ६.५% इतक्या चक्रवाढ वार्षिक दराने यात वाढ होईल, असा अंदाज आहे. याचे श्रेय नैसर्गिक आणि वनस्पती-आधारित उत्पादनांसाठी ग्राहकांमध्ये असणारी वाढलेली जागरुकता आणि प्राधान्य याला आहे. याव्यतिरिक्त, जुनाट आजारांची वारंवारता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवरचा वाढता भर यामुळे हर्बल न्यूट्रास्युटिकल्सची मागणी वाढली आहे. तसेच अॅथलीट्स आणि फिटनेससाठी उत्साही लोकांकडून हर्बल न्यूट्रास्युटिकल्सचा वाढता अवलंब होत असल्याने बाजाराच्या वाढीला चालना मिळाली आहे.

शेवटी, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि विशेष हर्बल स्टोअर्ससह विस्तारित विक्री चॅनेलमुळे विस्तृत ग्राहकवर्गाला हर्बल न्यूट्रास्युटिकल्स सहज उपलब्ध झाले आहेत. आरोग्य आणि निरोगीपणासाठी नैसर्गिक आणि समग्र दृष्टिकोनांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. मसाला आधारित न्यूट्रास्युटिकल्स या पद्धतीला चांगले संरेखित करतात, कृत्रिम पूरकांना नैसर्गिक पर्याय देतात.मसाल्यांच्या आरोग्यविषयक फायद्यांबद्दल ग्राहकांची जागरुकता वाढत असल्याने या क्षेत्रातील बाजारपेठेत नाविन्यपूर्ण उत्पादनांसाठी मोठी संधी आहे.

मसाले हे असे अष्टपैलू घटक आहेत, जे पूरक, कार्यात्मक अन्न, पेये आणि प्रासंगिक अनुप्रयोग अशा विविध प्रकारच्या पौष्टिक उत्पादनामध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. संशोधन वाढल्यामुळे जैवउपलब्धता, परिणामकारकता आणि ग्राहकसुलभता यांच्या दृष्टीने नवीन वितरण प्रणाली, फॉर्म्युलेशन्स आणि अप्लिकेशन्सचा शोध घेता येईल. निष्कर्षण तंत्रे, विश्लेषणात्मक पद्धती आणि बायोइन्फॉरमॅटिक्स, इत्यादी प्रकारची तंत्रज्ञानातील प्रगती संशोधकांना मसाला-आधारित न्यूट्रास्युटिकल्सची जटिल रचना आणि कृतीयंत्रणा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम करत आहे. नियामक संस्था न्यूट्रास्युटिकल्सचे संभाव्य आरोग्य कायदे ओळखत आहेत आणि त्यांच्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी चौकटी आखत आहेत, ज्यामुळे बाजारपेठेतील प्रदेश आणि ग्राहकांचा विश्वास सुलभ होईल.

भारत सरकार वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत मसाला मंडळाच्या माध्यमातून निर्यातदारांना नवीन उत्पादनांच्या विकासाच्या उद्देशाने मसाल्यांचे औषधी आणि पौष्टिक फायदे वैज्ञानिकरीत्या स्थापित करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी मदत करत आहे. यामुळे निर्यातदारांना कार्यकारी अन्न आणि आहारपूरक घटकरच्या उद्योन्मुख बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास मदत होऊन मसाला-आधारित उत्पादनांची व्याप्ती आणि मागणी वाढेल.

मसाला-आधारित न्यूट्रास्यूटिकल्समध्ये संशोधन वाढवण्यासाठी अन्न विज्ञान, पोषण, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि जैवतंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रातील संशोधकामध्ये आंतरविद्याशाखीय सहयोग आवश्यक आहे. सहयोगी प्रयत्नामुळे नावीन्यपूर्णतेला गती देण्यासाठी, संशोधनातील तफावत दूर करण्यासाठी आणि तांत्रिक आव्हानांवर मात करण्यासाठी वैविध्यपूर्ण कौशल्य आणि संसाधनांचा लाभ घेता येतो.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४
केंद्र सरकार सूर्योदय क्षेत्रात नावीन्य आणि संशोधनाला चालना देण्यासाठी ₹१ ट्रिलियन निधीची स्थापना करेल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे. सूर्योदय क्षेत्रातील संसोधन आणि नवोपक्रमाच्या फायद्यासाठी ५० वर्षांच्या व्याजमुक्त कर्ज तक्क्यासह ₹ १ लाख कोटींचा निधी उभारण्याच्या २०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रस्तावामुळे खासगी क्षेत्राला संशोधन आणि नवकल्पना मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल. यामुळे दीर्घकालीन अभिमुख प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि दीर्घ धारणा कालावधी असलेल्या स्टार्टअप्सना मदत होऊ शकेल. यामुळे मसाला-आधारित न्यूट्रास्युटिकल्सना प्रोत्साहन मिळते आणि वाढीव निर्यात फायद्यांसह भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

सारांश, उद्योन्मुख आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, ग्राहकांच्या नैसर्गिक आणि समग्र उत्पादनांच्या मागणीची पूर्तता करण्याची, सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी, वैज्ञानिक प्रगती, नियामक आराखड्याला दिशा देण्याची सहयोगी भागीदारीला वाव देण्याची तसेच कार्यकारी खाद्यपदार्थ आणि पूरक अन्नघटकांच्या वाढत्या जागतिक बाजारपेठेचा वेध घेण्याची क्षमता मसाला-आधारित न्यूट्रास्युटिकल्सचे संशोधन आणि नवकल्पना विकासामध्ये आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -