Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदान मिळवून देण्याची गणेश नाईकांची गॅरंटी!

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळासाठी मैदान मिळवून देण्याची गणेश नाईकांची गॅरंटी!

नवी मुंबई(प्रतिनिधी) - महापालिकेच्या यादव नगर येथील शाळे समोर असलेले मोकळे मैदान हे शाळेच्या मुलांना खेळण्यासाठीच राहणार ही आपली गॅरंटी असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले.दिघा येथे नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या ७७ क्रमांकाच्या हिंदी माध्यमाची शाळेची नविन इमारतीचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिंदी माध्यमा सोबत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून देखील महापालिकेच्या शाळेतून शिक्षण दिले जाईल.

ज्युनिअर केजी ते बी ए एम ए पर्यंतचे शिक्षण पालिकेच्या शाळेत मोफत दिले जाईल तसेच शाळेत ई लायब्ररी सुरू करण्यासाठी आपल्या आमदार निधीतून आवश्यक ती रक्कम देण्याचे त्यांनी जाहीर केले. यादव नगर येथे सुरू असलेल्या महापालिकेची शाळा मुलांना गरम होते. त्यांना कोंडल्यासारखे वाटते. त्यामुळे नवीन शाळा बांधण्यासाठी आपण आदेश दिले होते. शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन सन-२०१८ मध्ये आपल्या हस्ते करण्यात आले होते.

इमारतीचे बांधकाम सन -२०२० मध्ये पुर्ण झाले तरी उद्घाटन केले जात नव्हते. सध्या पालिकेचा कारभार प्रशासका कडे आहे लोकप्रतिनिधी नसल्याने या विधानसभा मतदारसंघाचा आपण आमदार असल्या या नात्याने इमारतीचे उद्घाटन केले. असे ही गणेश नाईक यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी काही मंडळी शाळेसमोर बिअर बार लॉजिंग बोर्डिंग चे उद्घाटन करतात त्यांना लाज वाटत नाही का असा सवाल करत शाळे समोर असलेले मोकळे मैदान मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देऊ ही आपली गॅरंटी आहे. असे गणेश नाईक म्हणाले.दरम्यान, शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे यासाठी शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करत निदर्शने केले.

Comments
Add Comment