मुंबई: चांगले आरोग्य हे प्रत्येकाला हवे असता. यासाठी लोक नानाविध प्रयोग करत असतात. जिमला जातात. फ्रुट्स खातात, ड्रायफ्रुट्सचे सेवन करतात. मात्र फार कमी लोक असतात जे स्वत:ला फिट ठेवतात. तुम्हालाही जर फिट राहायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
तसे तर बाजारात अनेक प्रकारचे ज्यूस, पावडर, औषधे मिळतात ज्यांच्या सेवनाने तुम्ही फिट राहाल असा दावा केला जातो. मात्र अनेकदा हे आरोग्यासाठी हानिकारक असते. आता तुम्ही घरातच राहून आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने तुमच्या शरीरास आवश्यक ती पोषकतत्वे मिळतात. यांचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरते.
हृदयाशी संबंधित समस्या होतात कमी
ड्रायफ्रुट्स व्हिटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबरने भरपूर असतात. यांच्या नियमित सेवनाने शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारते. ड्रायफ्रुट्समध्ये उर्जा असते ज्यामुळे दिवसभर एनर्जी तसेच ताकद मिळते. काही ड्रायफ्रुट्स विशेषकरून बदामामध्ये व्हिटामिन ई, फायबर आणि फॉलेटिक अॅसिड असते जे हृदयाशी संबंधित समस्या कमी करते. याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
असे करा सेवनl
ड्रायफ्रुट्सचे सेवन करण्यासाठी चांगली वेळ ही सकाळी मानली जाते. उष्ण प्रकृती असलेले ड्रायफ्रुट्स हे पाण्यात भिजवून त्याची साले काढून खावीत. आरोग्य तज्ञांच्या मते एक निोगी व्यक्ती १५ ते २५ ग्रॅम ड्रायफ्रुट्स दररोज खाऊ शकते.