मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने(BSNL) आपल्या स्वस्त प्लानमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. याचा सरळ परिणाम त्यांच्या लाखो युजर्सवर पडणार आहे. खरंतर, या कंपनीने आपल्या ९९ रूपयांच्या प्लानची व्हॅलिडीटी कमी केली आहे. यामुळे जे युजर्स हा प्लान वापरत होते त्यांना आता हा प्लान आधीपेक्षा महाग पडणार आहे.
बीएसएनएलने महाग केला प्लान
दरम्यान, युजर्सला आता बीएसएनएलच्या या प्लानसाठी ९९ रूपयेच खर्च करावे लागतील मात्र त्याची व्हॅलिडिटी आधीपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे आता या प्लानसाठी आधीच्या तुलनेत जास्त पैसे खर्च करावे लागतील. बीएसएनएलच्या ९९ रूपयांच्या प्लानमध्ये आधी १८ दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात होती. मात्र आता युजर्सला केवळ १७ दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. बीएसएनएलने या प्लानच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही मात्र व्हॅलिडिटी कमी करून या प्लानच्या डेली कॉस्टमध्ये वाढ केली आहे.
बीएसएनएलच्या युजर्सला या प्लानसाठी रोजचा खर्च ५.५० रूपये होत होता. आता त्यांचा हा खर्च ५.८२ रूपये इतका झाला आहे. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मइते. या प्लानमध्ये युजर्सला कोणतेही डेटाचे फायदे अथवा इतर फायदे मिळत नाहीत.
हा प्लान त्या लोकांसाठी आहे ज्यांना इंटरनेट डेटाची नव्हे तर केवळ कॉलिंगसाठी रिचार्ज प्लान हवा आहे. अशातच या युजर्सना आता हा बीएसएनएलचा प्लान महाग पडणार आहे.
काही दिवसांपूर्वी एअरटेलनेही आपल्या दोन रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की टेलिकॉम कंपन्यांना इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचे असेल तर रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ करावीच लागेल.
Very true.zero network always.the only govt.institution is working for नाम के वास्ते,
——————most lover of BSNL.
भारत सरकार बीएसएनएल च्या कर्मचाऱ्यांवर फुकट पैसे खर्च करत आहे. नेटवर्क प्रॉब्लेम, recharge, कस्टमर केअर ही बॅक office कर्मचारी सगळे आळशी आहे.