Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Nothing Phone 2aचा बंपर सेल, ६० मिनिटांत विकले गेले ६० हजार फोन्स- कंपनीचा दावा

Nothing Phone 2aचा बंपर सेल, ६० मिनिटांत विकले गेले ६० हजार फोन्स- कंपनीचा दावा

मुंबई: Nothing Phone 2a या मोबाईल फोनवर १२ मार्चला सेल लागला होता. सेल लागताच या फोनची बंपर विक्री झाली आहे. कंपनीने दावा केला आहे की काही मिनिटातंच या स्मार्टफोनचे अनेक हजार युनिट्स विकले गेले. Nothing Phone 2a हा फोन नुकताच कंपनीने लाँच केला आहे.


हा ब्रँडचा सर्वात स्वस्त फोन आहे यात अनेक आकर्षक फीचर्स आहेत. यात कंपनीने ट्रान्सपॅरेंट बॅक, 50MP+50Mp ड्युअल रेयर कॅमेरा तसेच ५००००एमएएच बॅटरी सारखे फीचर्स दिले आहेत.



६० हजार युनिट्सची विक्री


कंपनीने दावा केला आहे की ६० मिनिटांत त्यांच्या ६० हजार युनिट्सची विक्री झाली आहे. यासाठी कंपनीने फ्लिपकार्ट, क्रोमा स्टोर, विजय सेल्स आणि दुसऱ्या प्रमुख रिटेल स्टोर्सचे आभार मानले आहे.


हा सेल दुपारी १२ वाजता सुरू झाला होता. कंपनीने हा हँडसेट तीन कॉन्फिग्रेशन आणि दोन रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच केला आहे. याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रूपये आहे तर २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत २५,९९९ आणि १२ जीबी रॅमच्या व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रूपये आहे.


यावर २००० रूपये बँक डिस्काऊंट HDFC बँक कार्ड होल्डर्सला मिळत होता. याश्वाय फ्लिपकार्ट एक्सक्लुसिव्ह प्रमोशन कूपनच्या माध्यमातून २००० रूपयांचा डिस्काऊंट मिळत होता.सोबतच कंपनी २००० रूपयांचा एक्सचेंज बोनसही देत होती. या ऑफर्सनंतर फोनच्या सुरूवातीची किंमत १९,९९९ रूपये झाली होती.



स्पेसिफिकेशन


६.७ इंचाचा FHD+OLED डिस्प्ले
कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन
MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसर
८ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅम
१२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज
50MP+50Mpड्युअल कॅ्रा
32MP सेल्फी कॅमेरा
५००००एमएएच बॅटरी

Comments
Add Comment