मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपने बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने दिल्लीच्या उरलेल्या दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पूर्व दिल्ली येथून हर्ष मल्होत्रा आणि उत्तर पश्चिम दिल्लीतून योगेंद्र चंदोलिया यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दादर नगर हवेली येथून कलाबेन देलकर यांना तिकीट देण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना हिमाचलच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार बनवण्यात आले आहे. तर धारवाड येथून प्रल्हाद जोशी, नागपूरमधून नितीन गडकरी, करनाल येथून मनोहर लाल खट्टर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने सिरसा येथून अशोक तंवर यांना उमेदवार निवडले आहे.
दुसऱ्या यादीत भाजपने उमेदवारी दिलेल्यांची नावे
नागपूर(महाराष्ट्र) – नितीन गडकरी
दादरा नगर हवेली- कलाबेन देलकर
दिल्ली
पूर्वी दिल्ली- हर्ष मल्होत्रा
उत्तर पश्चिम दिल्ली (एससी)- योगेंद्र चंदोलिया
गुजरात
साबरकांठा- भीखाजी दुधाजी ठाकोर
अहमदाबाद पूर्व- हसमुखभाई सोमाभाई पटेल
भावनगर- निमुबेन बम्भानिया
वड़ोदरा- रंजनबेन धनंजय भट्ट
छोटा उदयपुर (एसटी)- जशुभाई भीलुभाई राठवा
सूरत- मुकेशभाई चंद्रकांत दलाल
वलसाड (एसटी)- धवल पटेल
हरियाणा
अंबाला- बंतो कटारिया
सिरसा- अशोक तंवर
करनाल- मनोहर लाल खट्टर
भिवानी-महेंद्रगढ़- चौधरी धरमबीर सिंह
गुड़गांव- राव इंद्रजीत सिंह यादव
फरीदाबाद- कृष्ण पाल गुर्जर
हिमाचल प्रदेश
हमीरपुर- अनुराग सिंह ठाकुर
शिमला (एससी)- सुरेश कुमार कश्यप
पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी(वाराणसी), अमित शाह(गांधीनगर) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(लखनऊ) यांच्या नावाचा समावेश होता.