मुंबई: तारक मेहता का उल्टा चष्मा हा एक टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो आहे. या मालिकेतील प्रत्येक चेहऱ्याला चाहत्यांनी पसंती दिली. या मालिकेत बबिता जी या नावाने प्रसिद्ध असलेल्या मुनमुन दत्ता या अभिनेत्रीबाबत आश्चर्यजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुनमुन दत्ताने या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणार राज अनादकट याच्याशी साखरपुडा केला आहे. राज तिच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे.
वडोदरामध्ये झाले मुनमुन आणि राजचा साखरपुडा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनी मुनमुन आणि राज यांचा साखरपुडा झाला आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वी मुंबईबाहेर म्हणजेच वडोदरामध्ये आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केला. त्यांच्या कुटुंबियाना दोघांच्या नात्याबाबत कोणताही आक्षेप नाही आणि ते खूप खुश आहेत.
शोच्या सेटवर राज आणि मुनमुनला झाले प्रेम
गेल्या काही काळापासून मुनमुन आणि राज यांच्या अफेयरच्या बातम्या समोर आल्या होत्या. बातमीनुसार जेव्हा राजने शोमध्ये एंट्री केली तेव्हा त्याची भेट मुनमुनशी झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. याची माहिती शोच्या बाकमी कलाकारांनाही होती. राज आता या शोमध्ये नाही. त्याने काही काळ काम केल्यानंतर शोला अलविदा म्हटले होते. यानंतर शोच्या प्रेक्षकांना मोठा झटका लागला होता.