मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड ठेवण्यासाठी दहीपेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही. ताक अथवा गोड लस्सी या कोणत्याही रूपात तुम्ही दही खाऊ शकता. मात्र काही लोकांना उन्हाळ्याच्या दिवसांत दही खाल्ल्याने त्रास होतो. जसे मुरूमे, अॅलर्जी, पाचनसंबंधी समस्या, शरीरामध्ये उष्णता वाढणे इत्यादी.
उन्हाळ्यात दही खाणे शरीरासाठी फायदेशीर असते मात्र अधिक प्रमाणात खाल्ल्यास त्यामुळे नुकसान होते. दह्याची प्रकृती उष्ण असते. त्यामुळे जेव्हा उन्हाळ्यात काहीजण दही खातात तेव्हा शरीरातील उष्णता वाढते. यामुळे चेहऱ्यावर मुरुमे, पुटकुळ्यासारख्या समस्या येतात.
उन्हाळ्यात दही खाण्याची योग्य पद्धत
लस्सी अथवा ताक तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत पिऊ शकता. कारण रिसर्चनुसार जेव्हा आपण दह्यामध्ये पाणी मिसळतो तेव्हा त्याची प्रकृती बॅलन्स होते. यामुळे दह्यातील उष्णता कमी होते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही उन्हाळ्यात दही खात असाल तर त्यात पाणी मिसळून चांगले फेटून खा. यामुळे शरीराला थंडावा मिळेल. तसेच आरोग्यासही अनेक फायदे होतील.
डिस्क्लेमर – वरील लेखात दिलेली माहिती ही मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारचा सल्ला अंमलात आणण्याआधी संबधित तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.