Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

७५ रूपयांच्या रिचार्जमध्ये कंपनी देत आहे ७.५ जीबी डेटा

७५ रूपयांच्या रिचार्जमध्ये कंपनी देत आहे ७.५ जीबी डेटा

मुंबई: फोनमध्ये मोबाईल डेटा नसेल तर सर्व कामे थांबतात. यावेळी जेव्हा रिचार्ज करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाला चांगल्यातील चांगला प्लान हवा असतो. डेटा अॅड ऑनसाठी प्रत्येक कंपन्या वेगवेगळे प्लान सादर करत असतात. अशातच व्होडाफोन-आयडियाने ग्राहकांसाठी खास प्लान सादर केला आहे. कंपनी आपल्या स्वस्त ७५ रूपयांच्या प्लानमध्ये अधिकचा डेटा देत आहे.


व्होडाफोनच्या ७५ रूपयांचा डेटा वाऊचर युजर्स तेव्हाच रिचार्ज करू शकतात जेव्हा तुमचा डेटा संपेल. हा प्लान तेव्हाच काम करेल जेव्हा फोनमध्ये कोणताही प्लान अॅक्टिव्ह नसेल.


ऑफरअंतर्गत कंपनीने ७५ रूपयांसोबत मिळणारे फायदेही वाढवले आहेत. व्हीआयच्या या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ६ जीबी डेटा दिला जात होता मात्र आता यासोबतच १.५ जीबी अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे. म्हणजेच यावर एकूण ७.५ जीबी डेटा मिळू शकतो. दरम्यान, याच्या व्हॅलिडिटीवर खास लक्ष द्यावे लागेल. या प्लानची व्हॅलिडिटी ७ दिवसांची आहे.


लक्षात ठेवा हा प्लान डेटा वाऊचर प्लान आहे यामुळे यात डेटाव्यतिरिक्त इतर कोणतेही फायदे मिळत नाहीत. हा प्लान अँड्रॉईड आणि आयओए ग्राहक व्होडाफोन अॅपवरून रिचार्ज करू शकतात.

Comments
Add Comment