
मॉस्को : रशियन मालवाहू लष्करी विमान कोसळून अपघात (Plane Crash) झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दु:खद माहिती समोर आली आहे.
रशियन लष्कराचे आयएल-७६ हे मालवाहू विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान कोसळले. या विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून फुटेजमध्ये क्रॅश साइटवरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, लष्करी मालवाहू विमानाला आग लागली आणि मॉस्कोच्या ईशान्येकडील इव्हानोव्हो प्रदेशात अपघात झाला. मंगळवारी ही घटना घडली, अशी माहिती द मॉस्को टाईम्सने दिली आहे.
दरम्यान, युक्रेनियन प्रिझनर्स ऑफ वॉरसह रशियन लष्करी विमान क्रॅश झाल्यानंतर एक महिन्यानंतर ही आणखी एक दुर्घटना घडली आहे.