मुंबई : बोरिवली पश्चिमेकडील इमारतीचे बांधकाम सुरु असताना सोळाव्या मजल्यावरील मचान कोसळले. यात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. अन्य एका मजुराची प्रकृती चिंताजनक असून त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्पना चावला चौक परिसरात हा दुर्दैवी अपघात झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशनम दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
#UPDATE | Three people died in the incident of scaffolding collapse in Borivali West in Mumbai, one admitted to hospital in critical condition.
— ANI (@ANI) March 12, 2024