Thursday, July 10, 2025

Mumbai Metro : मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर, आता एकाच तिकीटावर कुठेही फिरा!

Mumbai Metro : मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर, आता एकाच तिकीटावर कुठेही फिरा!

मुंबई : मुंबईत मेट्रो (Mumbai Metro) सुरु झाल्यापासून प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. मात्र, मुंबईकरांना मेट्रोच्या वेगवेगळ्या मार्गीकांचे तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबावे लागते. परंतु आता मेट्रोच्या सर्व मार्गांचे एक तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.


सध्या मुंबईत मेट्रो १ सह मेट्रो २ अ व मेट्रो ७ (गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गे दहिसर) या मेट्रो मार्गिका सुरू झाल्या आहेत. यापैकी मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिका एमएमआरडीएकडे असल्याने त्या मार्गाचे संयुक्त तिकीट (Metro Ticket) काढता येते. परंतू मेट्रो १ मार्गिकेसाठी वेगळे तिकीट काढावे लागत होते. आता मात्र सर्व मार्गांचे एकच तिकीट मिळणार आहे.


मेट्रो १, मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिका गुंदवली व अंधेरी पश्चिम या स्थानकाजवळ संलग्न होतात. मात्र तसे असतानादेखील मेट्रो १ चे तिकीट स्वतंत्र काढावे लागत होते. कारण, मेट्रो १ ही राज्य सरकारच्या ताब्यात होती. आता ही मार्गिका एमएमआरडीएकडे आल्यानंतर घाटकोपर-वर्सोवा (Ghatkopar-Versova Metro) व गुंदवली ते अंधेरी पश्चिम या तिन्ही मार्गिकांवरील स्थानकांचे एकत्रित तिकीट प्रवाशांना काढता येईल. ही मार्गिका खरेदी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Comments
Add Comment