Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीSidhu Moose Wala : सिद्धू मुसेवालाची आई खरंच प्रेग्नंट? सिद्धूच्या बाबांनी थेटच...

Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवालाची आई खरंच प्रेग्नंट? सिद्धूच्या बाबांनी थेटच सांगितलं…

सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले…

मुंबई : दिवंगत पंजाबी पॉप गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या आईबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. त्याची आई गरोदर असून लवकरच त्यांच्या घरी पाहुण्याचे आगमन होणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. सिद्धू मुसेवाला यांची आई चरण कौर (Charan Kaur) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. याबाबत आता सिद्ध मुसेवालाचे वडील बलकौर सिंह (Balkaur Singh) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी या प्रकारावर थेट भाष्य केलं आहे.

एकलुता एक मुलगा असलेला सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील एकटे पडले. त्यामुळे IVF च्या मदतीने सिद्धूची आई ५८ वर्षाच्या गरोदर असून आता लवकरच मुलांना जन्म देणार असल्याचे वृत्त होते. या वृत्ताच्या दरम्यान सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे.

ते म्हणतात, ‘आमच्या कुटुंबाबद्दल चिंता, काळजी व्यक्त करणाऱ्या सिद्धूच्या चाहत्यांचे आभार. पण मी आवाहन करतो की, कुटुंबाबाबत अनेक अफवा सुरू आहेत. या अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नये. ज्या काही बातम्या असतील, त्या कुटुंबीयांच्या वतीने देण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले.

कोण आहे सिद्धू मुसेवाला?

सिद्धू मुसेवाला याने गीतलेखनापासून त्याच्या संगीतक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. गायनापासून सुरू झालेला त्याचा प्रवास त्याला पुढे राजकारणापर्यंत घेऊन गेला. आपल्या गायकीच्या जोरावर सिद्धू मुसेवालाने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी तरुणाईला वेड लावले होते. आता मृत्यूनंतरही तो त्याच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. त्याची गाणी आजही अनेक पार्ट्यांमध्ये किंवा लग्नसोहळ्यांत वाजवली जातात. सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी हत्या करण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -