Artificial Intelligence : एआयमुळे जगावर 'वीजसंकट'!

दर तासाला वापरली जातेय १७ हजार पट अधिक उर्जा


वॉशिंग्टन : आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे (Artificial Intelligence) एकीकडे लोकांची बरीच कामे सोपी झाली आहेत. मात्र, हळू-हळू एआयचे अनेक धोके देखील समोर येत आहेत. एकीकडे एआयमुळे नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता याच एआयमुळे जगावर मोठे वीज संकटही येऊ शकते, असा एका रिपोर्टमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.


दि न्यूयॉर्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, ओपनएआय कंपनीचा चॅटजीपीटी हा चॅटबॉट एका तासाला तब्बल ५ लाख किलोवॅट वीज खर्च करतो. सध्या जगभरात कित्येक मोठ्या कंपन्यांनी आपले आपले एआय चॅटबॉट लाँच केले आहेत. एकट्या चॅटजीपीटीची आकडेवारी एवढी असेल, तर सगळ्यांची मिळून किती वीज खर्च होत असेल, हा विचारच हादरवून टाकणारा आहे.


रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील घरांमध्ये मिळून जेवढी वीज वापरली जाते, त्या तुलनेत तब्बल १७,००० पट अधिक वीज चॅटजीपीटी दररोज वापरते.


चॅटजीपीटीच्या केवळ २० कोटी यूजर्ससाठी हा खर्च होतो. भविष्यात चॅटजीपीटीचा विस्तार झाला, त्याचे यूजर्स वाढले की पर्यायाने त्यासाठी होणारा विजेचा वापरही अधिक होणार आहे.


बिझनेस इन्सायडरला दिलेल्या मुलाखतीत डेटा सायंटिस्ट अ‍ॅलेक्स डी. व्रीज यांनी सांगितले, की गुगल सध्या प्रत्येक सर्च रिझल्टमध्ये जनरेटिव्ह एआय वापरत आहे. एआयमुळे वर्षाला सुमारे २९ बिलियन किलोवॅट प्रतितास एवढी वीज वापरली जाते. केनिया, क्रोएशिया अशा छोट्या देशांना संपूर्ण वर्षभरासाठी देखील ही वीज पुरून उरते, असे त्यांनी स्पष्ट केले.


एआयचा वापर जेवढ्या प्रमाणात वाढणार आहे, तेवढा त्यासाठी लागणाऱ्या विजेचा वापरही वाढणार आहे. एआयचे यूजर्स सध्या तुलनेने अगदीच कमी आहेत. मात्र, भविष्यात जेव्हा सगळ्या क्षेत्रांमध्ये एआय पसरेल आणि यूजर्स वाढतील तेव्हा त्यासाठी होणाऱ्या वीजेचा वापरही भरमसाठ वाढणार आहे. यामुळे आतापासूनच एआय कंपन्यांनी सोलर किंवा अन्य हरित उर्जेचा वापर करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Comments
Add Comment

The Epstein Files : डोनाल्ड ट्रम्पच्या आरोपांशी संबंधित रेकॉर्ड रोखल्याबद्दल एफबीआय चौकशी करणार

अमेरिकेचा न्याय विभाग जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित असलेली काही कागदपत्रे चुकवून सार्वजनिक होण्यापासून

अफगाण सैनिकांनी पाडले पाकिस्तानचे एफ-१६ फायटर-जेट

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी युद्धाची घोषणा केली. दरम्यान, तालिबानने

इस्रायलच्या सहा देशांच्या आघाडीला पाकिस्तान घाबरला; या आघाडीला पाकिस्तान सिनेटकडून विरोध

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारतासह अनेक देशांसोबत ‘हेक्सागन ऑफ अलायन्सेस’ म्हणजेच सहा

ब्राझीलमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

ब्राझीलमध्ये निसर्गाचा भीषण कहर पाहायला मिळत आहे. दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि

कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही, कार्नी सरकारची अधिकृत भूमिका

ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कार्नी भारत दौऱ्यात

Iran Helicopter Crash : लष्करी हेलिकॉप्टर कोसळून चौघांचा मृत्यू

अमेरिकेसोबत सुरू असलेल्या भीषण तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२४ फेब्रुवारी) इराणच्या मध्य भागात एक लष्करी