Sunday, August 10, 2025

Airtelचा ग्राहकांना जोरदार झटका! महाग केले हे रिचार्ज प्लान

Airtelचा ग्राहकांना जोरदार झटका! महाग केले हे रिचार्ज प्लान

मुंबई: एअरटेलने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपले दोन रिचार्ज प्लान महाग केले आहेत. हे दोन्ही प्रीपेड प्लान आहेत. एअरटेलने ११८ रूपये आणि २८९ रूपयांच्या प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. हे ४जी डेटा वाऊचक प्लान आहेत. अशातच आता ११८ रूपयांच्या प्लानसाठी तुम्हाला १२९ रूपये द्यावे लागतील. तर २८९ रूपयांच्या प्रीपेड प्लानसाठी तुम्हाला ३२९ रूपये द्यावे लागतील.



का वाढवली किंमत?


एअरटेलला आपल्या अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर्स म्हणजेच ARPUमध्ये वाढ करायची आहे. याच कारणामुळे चांगले रिटर्न मिळण्यासाठी एअरटेल आपल्या प्लानवर काम करत आहे. या योजनेंतर्गत एअरटेलने आपल्या दोन प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे.



Airtelचा ३२९ रूपयांचा प्लान


या प्लानची व्हॅलिडिटी ३५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सला ४ जीबी डेटा ऑफर केला जाईल. सोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतील.



Airtel चा १२९ रूपयांचा प्लान


या प्लानमध्ये एकूण १२ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय या प्लानमध्ये इतर कोणतेही जसे कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळत नाही.

Comments
Add Comment