Monday, May 12, 2025

देशमहत्वाची बातमी

Supreme court on SBI : स्टेट बँकेची मागणी फेटाळत सुप्रीम कोर्टाने दिला दणका!

Supreme court on SBI : स्टेट बँकेची मागणी फेटाळत सुप्रीम कोर्टाने दिला दणका!

उद्याच निवडणूक रोख्यांची माहिती देण्याचे दिेले आदेश


नवी दिल्ली : स्टेट बँकेने (State Bank of India) निवडणूक रोख्यांचा (Electoral bonds) तपशील जाहीर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे (Supreme court) मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला (SBI) दणका दिला आहे. शिवाय उद्याच निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला (Election Commission) देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला दिले आहेत. त्यामुळे हा स्टेट बँकेला मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.


स्टेट बँकेने निवडणूक रोख्याची माहिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे ३० जूनपर्यंतची वेळ मागितली होती. पण, आतापर्यंत तुम्ही काय केलं असं म्हणत सुप्रीम कोर्टाने बँकेला फटकारलं आहे. तसेच निवडणूक आयोगालाही ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यासाठी १५ मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे स्टेट बँकेने माहिती देण्यास टाळाटाळ केली तर कारवाई करण्याचा इशारा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.



Comments
Add Comment