मुंबई: वरिष्ठ नागरिकांसाठी त्यांची जमवलेली पूंजी हीच सर्वात मोठी ताकद असते. यासाठी ते गुंतवणुकीचे विविध पर्याय शोधत असतात जिथे त्यांना गॅरंटेड रिटर्न्स मिळतील. अधिकतर वरिष्ठ नागरिकांसाठी फिक्स डिपॉझिट(fixed deposit) म्हणजेच एफडी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरत आहे.
मोठ्या सरकारी तसेच खाजगी बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँका एफडीवर अधिक व्याजदर देत आहेत. नुकतेच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने २ कोटीहून कमी रकमेच्या काही कालावधींसाठीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने २५ महिन्यांच्या एफडीवरील व्याजदरात ०.४१ टक्क्यांनी वाढ केली आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे नवे दर १ मार्च २०२४ पासून लागू आहेत.
४ टक्के ते ९.२५ टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ
या बदलासोबतच आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक एफडीवर सामान्य नागरिकांसाठी ४ टक्के ते ९.०१ टक्के व्याजदर देत आहे. तर वरिष्ठ नागरिकांसाठी ४.५० टक्के ते ९.२५ टक्के व्याजदर देत आहे.
बचत खात्यावर ७.७५ टक्के व्याजदर
बँक आपल्या बचत खात्याच्या ग्राहकांना ५ रूपयांपासून ते २५ कोटी रूपयांच्या स्लॅबमध्ये ७.७५ टक्के व्याजदर देत आहे.
वरिष्ठ नागरिकांना २ वर्षे १ महिन्याच्या कालावधीसाठी व्याजदर ९.२५ टक्के इतके आहे तर सामान्य नागरिकांसाठी ९.२५ टक्के आहे.
२ वर्षे ३ दिवस ते २५ महिन्यांपेक्षा कमीच्या कालावधीसाठी सामन्य जनतेला ८.६० टक्के दराने व्याज मिळत आहे तर वरिष्ठ नागरिकांना ९.१० टक्के दराने व्याज मिळत आहे.