Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीMarathi Biopic : 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा उत्कंठावर्धक दुसरा टिझर रिलीज

Marathi Biopic : ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चा उत्कंठावर्धक दुसरा टिझर रिलीज

आजपर्यंतचा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) अनेक नवनवे विषय हाताळले जातात. त्यातच मराठीत जीवनपटांनांही (Biopics) प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देतात. ज्येष्ठ गायक, अभिनेते व संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर बेतलेला ‘मी वसंतराव’ तर शाहीर साबळे यांच्या जीवनावर बेतलेला ‘महाराष्ट्र शाहीर’देखील चांगलाच गाजला. असाच एक नवाकोरा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Swargandharva Sudhir Phadake) असं या चित्रपटाचं नाव असून सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे.

सुधीर फडके म्हणजेच सगळ्यांचे लाडके बाबूजी यांची सखी मंद झाल्या तारका, तोच चंद्रमा नभात, धुंद एकांत हा ही प्रेमगीते तर कानडा राजा पंढरीचा, देहाची तिजोरी, विठ्ठला तू वेडा कुंभार यांसारखी अनेक भक्तिगीते मराठी रसिकांच्या मनाला आजही तितकीच भुरळ घालतात. त्यांच्या या गायकीचा प्रवास ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमातून उलगडण्यात येणार आहे. प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे (Sunil Barve) या चित्रपटात सुधीर फडके यांची भूमिका साकारणार आहे.

गेल्यावर्षी २५ जुलै म्हणजेच बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचा दुसरा टीझर आज (Teaser out) प्रदर्शित करण्यात आला. टीझरमधून प्रेक्षकांना बाबूजी यांच्या संगीतक्षेत्रातील प्रवासाबद्दल बरीच नवी माहिती मिळणार आहे याचा अंदाज येत आहे. तसेच या चित्रपटातील त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यातीलही बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला जाणार आहे हे या टीझरमधून स्पष्ट होत आहे.

टीझरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात मागे ऐकू येणारी बाबूजी यांच्याच सुमधुर आवाजातील गाणी आणि त्याच्याशी साधर्म्य साधणारे दृश्य. यामुळे हा टीझर प्रेक्षकांना आणि खासकरून बाबूजींच्या चाहत्यांना भावला आहे. बाबूजी यांच्या जीवनातील वेगवेगळे टप्पे यात पाहायला मिळणर आहेत.

रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -