नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँडसंदर्भात (Electoral Bonds) स्टेट बँकेला झापल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या आधी १५ मार्च रोजी होणारी निवडणूक आयोगाची (Election Commission) बैठक आता १३ किंवा १४ मार्च रोजी होणार आहे. यावेळी निवृत्ती आणि राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या दोन निवडणूक आयुक्तांची नेमणूक होणार असून लोकसभेच्या निवडणुका या १५ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
अनुप चंद्र पांडे यांची निवृत्ती आणि अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे आता सर्व धुरा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या एकट्याच्याच खांद्यावर आहे. त्यामुळे १५ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार होती. त्यामध्ये रिक्त असलेल्या दोन निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात येणार होती. त्यानंतर सोमवारी म्हणजे १८ मार्च किंवा त्यानंतर निवडणुकीची घोषणा करण्यात येणार होती.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला दणका दिला असून १२ मार्च रोजी निवडणूक रोखे म्हणजे इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. एसबीआयने याची माहिती देण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ मागितली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयवर ताशेरे ओढत मंगळवारचे (१२ मार्च) कामकाज संपण्यापूर्वीच सगळी माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायायलाने एसबीआयला १२ मार्च पर्यंत निवडणूक रोख्यांची माहिती द्यायला सांगितल्यानंतर मात्र आयोगाच्या हालचाली आता गतीमान झाल्याचे दिसून येत आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…