Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीअपोलोने ब्रेन ट्यूमर रुग्णांसाठी आणले 'झॅप-एक्स' तंत्रज्ञान

अपोलोने ब्रेन ट्यूमर रुग्णांसाठी आणले ‘झॅप-एक्स’ तंत्रज्ञान

जगभरातील ब्रेन ट्यूमर्स रुग्णांसाठी ‘झॅप-एक्स’ तंत्रज्ञान एक अचूक उपचार

नवी मुंबई: अपोलो हॉस्पिटल्स या भारतातील आरोग्य सेवा पुरवठादाराने आज झॅप-एक्स या गायरोस्कोपिक रेडिओसर्जरी प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले, ही ब्रेन ट्यूमर उपचारातील एक क्रांतिकारक प्रगती असून यामुळे दक्षिण आशियात हे पहिले जबरदस्त तंत्रज्ञान सादर करण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. झॅप-एक्ससह, अपोलो हॉस्पिटल्सने भारत आणि जगभरातील रुग्णांसाठी जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा प्रदाता ठरला आहे. झॅप-एक्सने ब्रेन ट्यूमर उपचारात एका नवीन युगाचा प्रारंभ केला आहे, ज्यामध्ये रुग्णांना केवळ ३० मिनिटे चालणाऱ्या सत्रांसह एक अनाक्रमक, वेदना-मुक्त पर्याय देऊ केला जातो.

ourया परिवर्तनात्मक तंत्रज्ञानामध्ये अगदी कमीतकमी किरणोत्सर्गाला उघड व्हावे लागते, ज्यामुळे परिणामकारकता आणि रुग्णांना आराम मिळण्यासाठी नवीन मानके उपलब्ध होतात. पारंपरिक पद्धतींच्या विपरीत, झॅप-एक्समध्ये स्व-संरक्षित, गायरोस्कोपिक लिनीअर अॅक्सिलरेटर डिझाइनचा वापर केला जातो, ज्यामुळे हजारो संभाव्य कोनातून रेडिओसर्जिकल शलाका निर्देशित करून, हव्या त्या ट्यूमर किंवा लक्ष्यावर रेडिएशन केंद्रित करता येते. ही अभिनव पद्धत मेंदूचा स्तंभ, डोळे आणि डोळ्याच्या नसा यांसारख्या गुंतागुंतीच्या संरचना टाळण्याची क्षमता वाढवते व त्यामुळे रुग्णाच्या निष्पत्तीमध्ये सुधारणा होते. तसेच मेंदूच्या निरोगी ऊतीचे रक्षण करते.

डॉ. प्रथाप चंद्र रेड्डी, अध्यक्ष-संस्थापक, अपोलो हॉस्पिटल्स समूह म्हणाले, “चार दशकांहून अधिक काळ, अपोलो हॉस्पिटल्स आरोग्य सेवेमध्ये आघाडीवर आहेत, अपवादात्मक काळजी प्रदान करण्यासाठी सातत्याने समोर येणाऱ्या मर्यादांना आव्हान देत असतात. ही परंपरा कायम ठेवत, आम्ही झॅप-एक्सचे उद्घाटन केले आहे, जे ब्रेन ट्यूमरच्या उपचारांसाठी तयार केलेले एक अभिनव तंत्रज्ञान आहे. या नवीन दृष्टीकोनात किरणोत्सर्गाला कमीतकमी उघड व्हावे लागते आणि 30 मिनिटांपर्यंत अनाक्रमक, वेदना-मुक्त सत्र करता येतात. ज्यामुळे उपचारानंतर रुग्णाचे स्वास्थ्य आणि जीवनाची गुणवत्ता सुनिश्चित होते. तसेच, ही बाह्यरुग्ण विभागातील प्रक्रिया असल्याने रुग्णांसाठी अधिक सोयीची आणि सहज घेता येणारी आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी आणि संपूर्ण जगभरातील लोकांसाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. कारण ब्रेन ट्यूमर्सपर्यंत कसे पोहोचता येते आणि त्यावर कसे उपचार केले जातात यासाठी हे वरदान ठरेल. असंसर्गजन्य रोगांच्या (एनसीडी) वाढत्या लाटेमुळे, ज्यामध्ये कर्करोग एक महत्त्वाचा भाग आहे, झॅप-एक्स हे असंसर्गजन्य विरुद्धच्या आमच्या लढ्यातील एक नवीन साधन असेल.”

प्रा.जॉन आर.एडलर, संस्थापक-सीईओ, प्राध्यापक-झॅप सर्जिकल आणि न्यूरोसर्जरी, स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिन म्हणाले, “स्टीरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी ही गेल्या शतकातील सर्वात महत्त्वाची वैद्यकीय प्रगती आहे. पात्र रूग्णांना यापुढे दुर्बल करणारे शस्त्रक्रियेचे अनुभव येऊ नयेत किंवा संपूर्ण मेंदूच्या रेडिओथेरपीद्वारे संभाव्यतः संज्ञानात्मक क्षमता गमवावी लागू नये. त्याऐवजी, झॅप-एक्स रेडिओसर्जरीसह, रूग्णांवर आता बाह्यरुग्ण विभागामध्ये त्वरीत उपचार केले जाऊ शकतात आणि बहुतेक वेळा त्याच दिवशी कोणतीही चीर द्यावी न लागता आणि वेदना न होता ते सामान्य कामांवर परत जाऊ शकतात.”

झॅप-एक्स तंत्रज्ञान प्रमुख फायद्यांसह येते ज्यामध्ये ते अनाक्रमक असल्यामुळे विशिष्ट ब्रेन ट्यूमर्ससाठी शस्त्रक्रियात्मक हस्तक्षेप आवश्यक नसतो, ते वेदनामुक्त आहे; आणि अल्प उपचार कालावधी आणि वर्धित रूग्ण सुरक्षिततेसाठी फ्रेमलेस, अचूक आणि वास्तव वेळेतील प्रतिमा मार्गदर्शन प्रदान करते. कमीत कमी आनुषंगिक परिणामांसह विविध परिस्थितींवर प्रभावी नियंत्रण आणि आराम सुनिश्चित करून झॅप-एक्स जास्त यश देते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -